Vice President C P Radhakrishnan saam tv
देश विदेश

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Vice President Election Result: भारत राष्ट्र समिती (BRS) आणि बिजू जनता दल (BJD) व्यतिरिक्त, शिरोमणी अकाली दलाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. अकाली दल (वारीस पंजाब दे) चे खासदार सरबजीत सिंग खालसा आणि अमृतपाल सिंग यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

Bharat Jadhav

  •  लोकसभेचे २९३ खासदार आणि राज्यसभेचे १२९ खासदार आहेत.

  • या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करण्यास पात्र होते. 

  • १४ खासदारांनी क्रॉस मतदान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय.

भारताचे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांची निवड झालीय. उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान घेण्यात आले. संध्याकाळी मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपराष्ट्रपतिपदासाठी ९८.३ टक्के मतदान झाले. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली. तर बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली.

जेपी धनखड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपतीचा राजीमाना दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. आज सकाळी उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर साडेसहा वाजता मत मोजणी करण्यात आली.

असे होत निवडणुकीचं गणित

या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करण्यास पात्र होते. इलेक्टोरल कॉलेजमध्ये एकूण ७८८ सदस्य आहेत. यामध्ये राज्यसभेचे २४५ आणि लोकसभेचे ५४३ सदस्य आहेत. सध्या या सदस्यांची एकूण संख्या ७८१ आहे. कारण राज्यसभेत ६ आणि लोकसभेत ३ जागा खाली आहेत, अशात विजयासाठी ३९१ मतांची गरज होती.

दरम्यान NDA जवळ लोकसभेचे २९३ खासदार आणि राज्यसभेचे १२९ खासदार आहेत. तर इंडिया आघाडीकडे एकूण ३२५ खासदार आहेत. या अंदाजानुसार, सीपी राधाकृष्णन यांचाच विजय होणार असल्याची चर्चा होती. आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष YSRCPनं एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. या पक्षाचे ११ खासदार आहेत. तर AIMIMच पक्षानं इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली. असून १४ खासदारांनी क्रॉस मतदान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय. तर १५ मते बाद ठरवण्यात आली.

सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली असून १४ खासदारांनी क्रॉस मतदान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय. तर १५ मते बाद ठरवण्यात आली. विरोधी पक्षांकडून मिळालेल्या १४ मतांचं एनडीएला फायदा झाला. काही मते बाद ठरवल्या गेल्यानंतर विरोधी पक्षाचा म्हणजे इंडिया आघाडीचं नुकसान झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा; फडणवीस सरकारकडून शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फी माफी, कुठल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?

Maharashtra Live News Update : ४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Cough Syrup : कफ सिरपमुळं नागपुरात दाखल झालेल्या १३ मुलांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा खळबळून जागे

Naga Chaitanya : समंथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य अन् शोभिता धुलिपालाची लव्हस्टोरी कशी फुलली?

Aadhaar Card Update: आता नाही द्यावे लागणार ₹१२५, मोफत होणार आधार अपडेट, UIDAI चा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT