Vice President Election: उपराष्ट्रपती निवडणुकीआधी मोठी घडामोड; 'या' दोन पक्षांचा मतदानास नकार, काय आहे कारण?

Vice Presidential Election: उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मतदान होणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहेत. दरम्यान उपराष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या मतदानाच्या आदल्या दिवशी दोन पक्षांनी मोठा निर्णय घेतलाय.
Vice Presidential Election
BRS and BJD step back from Vice President election voting, creating a political twist.saam Tv
Published On
Summary
  • उपराष्ट्रपती निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

  • बीआरएस आणि बीजेडी या दोन पक्षांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला.

  • हे दोन्ही पक्ष केंद्रातील कोणत्याही आघाडीशी संबंधित नाहीत.

उपराष्ट्रपती निवडणूक उद्या म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. अशात दोन पक्षांनी मोठा निर्णय घेत या मतदानापासून राहण्याचं ठरवलंय. भारतीय राष्ट्र समिती (BRS ) ने आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्त्वाखालील बीजू जनता दल (BJD ) ने मतदानापासून मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष केंद्रात कोणत्याच आघाडी , युतीचा भाग नाहीत.

Vice Presidential Election
Vice president election: काँग्रेसच्या चालीमुळे एनडीएच्या मित्रपक्षासमोर पेच, उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपला चेकमेट

दोन्ही पक्षांनी सांगितलं की, एनडीए आणि इंडिआ आघाडीसोबत समान अंतर राखणार आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेणार नाहीत. तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना युरिया मिळत नाहीये. त्याबदलची नाराजी यातून व्यक्त केली जाणार असल्याचं बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी रामाराव यांनी सांगितलं.

Vice Presidential Election
Aadhaar Card: सुप्रीम कोर्टाचा नागरिकांना 'आधार'; नागरिकत्वासाठी आधार कार्ड ग्राह्य धरा, निवडणूक आयोगाला आदेश

नोटाचा पर्याय निडला असता - बीजेडी

भाजप आणि काँग्रेस पक्ष युरियाचा प्रश्न मार्गी लावण्यात कमी पडलेत, असा आरोप त्यांनी केलाय. युरियासाठी शेतकरी दुकानासमोर दररोज रांग लावत आहेत. त्यादरम्यान त्यांच्या हाणामारी होतेय. जर उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या मतदानात जर नोटाचा पर्याय राहिला असता तर आम्ही तोच पर्याय निवडला असता असे केटीआर म्हणालेत.

Vice Presidential Election
Jagdeep Dhankhar: आजारपण की राजकारण? काय आहे, उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी?

एनडीए आणि इंडिया आघाडीपासून दोन हात लांब- BJD

बीजेडी नेते सस्मित पात्रा म्हणाले की, त्यांच्या पक्षाची प्राथमिकता ओडिशामधील साडेचार कोटी लोक आहेत. आमच्या पक्षाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी वरिष्ठ नेते आणि खासदारांशी चर्चा केल्यानंतर मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही गटांसोबत अंतर ठेवून आहोत. आमचे लक्ष ओडिसा आणि तेथील लोकांचा विकस करण्याकडे आहे.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. सायंकाळी ५ वाजता मतदान संपणार आहे. इंडिया आघाडीने न्यायमूर्ती (निवृत्त) बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिलीय. एनडीएने सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिलीय. उपराष्ट्रपतीची निवड एका निवडणूक मंडळाद्वारे केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com