Jagdeep Dhankhar: आजारपण की राजकारण? काय आहे, उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी?

Vice President Jaideep Dhankhar resignation Story: जयदीप धनखड यांनी अचानकपणे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. धनखड यांनी आरोग्याचं कारण देत राजीनामा दिला परंतु काही दिवसापूर्वी त्यांनी निवृत्तीचा प्लॅन सांगितला होता. त्यामुळे हे कारण खरं नसावं असं म्हटलं जात आहे.
Vice President Jaideep Dhankhar resignation
Vice President Jagdeep Dhankhar's rumoured resignation sparks debate over health and politicssaam tv
Published On
Summary
  • जयदीप धनखड यांच्या राजीनाम्याची चर्चा दिल्लीतील राजकारणात जोरात सुरू आहे.

  • प्रकृती कारणामुळं राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र काही जण यामागे राजकीय डाव असल्याचं म्हणत आहेत.

  • भाजपमध्ये अंतर्गत फेरबदल आणि आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जात असल्याची शक्यता.

  • अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसून, यावरून राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. धनखड यांनी स्वतः आरोग्याचे कारण सांगितले असलं तरी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचे नेते वेगवेगळ्या प्रकारच्या शंका व्यक्त करत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची स्टोरी नेमकी काय बाबत अनेक दावे केले जात आहे. कोणी याचा संबंध बिहार निवडणुकीशी जोडत आहे, तर कोणी त्याला आरोग्याचं कारण देत आहेत.

राजीनाम्याची स्टोरी काय?

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे दुपारी ४ वाजेपर्यंत कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होतं. धनखड यांनी राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशी अध्यक्षपद भूषवलं. सभागृहाच्या व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहिले. दुपारी ३.५३ वाजता, एका सरकारी निवेदनात म्हटले आहे की उपराष्ट्रपती बुधवारी जयपूरला भेट देतील. पण काही तासात धनखड यांनी उपराष्ट्पती पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करताच राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाला.

धनखड यांनी आपण बिघडत्या आरोग्यामुळे राजीनामा देत असल्याचं कारण दिलं. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला. राजीनामा देण्याआधी त्यांच्या केंद्रातील नेत्यासोबत फोनवर चर्चा झाली त्या फोनवर त्यांचा वाद झाला, त्यानंतर जयदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा एका बाजुला सुरू आहे.

भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या दबावातून त्यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे. दरम्यान त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारकडून असं कोणतेच अधिकृत विधान केलं नाहीये. इतकेच काय एकाही केंद्रीय नेत्यानं त्याबाबत ट्विट केलं नाहीये. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

कारण धनखड यांनी त्यांच्या निवृत्तीचा प्लॅन १५ दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात सांगितला होता. १० जुलै रोजी जेएनयूमधील एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्टपणे सांगितले होतं की, ते उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर निवृत्त होतील. मग अचानक असे काय झाले की त्यांनी मध्येच राजीनामा देऊन टाकाला.

Vice President Jaideep Dhankhar resignation
Jagdeep Dhankhar Resign : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, राज्यसभा अध्यक्षांची जागा कोण घेणार? वाचा नियम

सरकारच्या भूमिकेवर नाराज

काही विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मते, धनखड काही दिवसांपासून सरकारच्या भूमिकेवर नाराज होते. ऑपरेशन सिंदूर बाबतचं विधान आणि न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात चालवण्यात येणारा महाभियोग प्रकरणानंतर ते दबावात होते. विरोधकांनी एका बैठकीचा हवाला देताना सांगितलं की, एका बैठकीत केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि किरेन रिजिजू हे उपस्थित राहिले नव्हते.

जे पी नड्डा आणि रिजिजू हे बैठकीत अनुपस्थित राहणार आहेत, याबाबत धनखड यांना माहिती नव्हतं. दुसरीकडे जेपी नड्डा य़ांच्या विधानाची मोठी चर्चा होत आहे. पण त्यांचे विधान व्हायरल होताच त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे जेपी नड्डा यांच्या विधानावर धनखड नाराज असतील असं वाटत नाही.

दरम्यान काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, नड्डा आणि रिजिजू हे बीएसीच्या बैठकीत आले नाहीत, त्यामुळे धनखड नाराज होते. जगदीप धनखड हे नियम, काम आणि शिष्टाचाराचे काटेकोर पालन करणारे होते. परंतु त्यांच्या भूमिकेत या गोष्टी सतत दुर्लक्षित केल्या जात असल्याचे त्यांना वाटू लागलं होतं.

पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले, संध्याकाळी ५ वाजता प्रमोद तिवारी आणि अखिलेश प्रसाद सिंह यांनी अध्यक्ष धनखड यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वकाही ठीक होतं. बिझनेस अॅडव्हायझरी कमेटीची बैठक मंगळवारी सकाळी १० वाजता होईल. त्यानंतर संध्याकाळी धनखड यांना फोन केला तेव्हा ते त्यांच्या कुटुंबियांसोबत होते. त्यावेळी त्यांनी बैठकीची माहिती दिली.

धनखड यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच अनेक नावांवर चर्चा होत आहे. सर्व नावे कोणत्या ना कोणत्या प्रकारे बिहारशी जोडलेली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत म्हणाले की, काही स्रोतांकडून ज्या नावांची चर्चा होतेय, त्यापैकी बहुतेक नावे अशी आहेत, जी बिहार निवडणुकीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पाडतात.

दरम्यान त्यांच्या राजीनाम्यामागे अनेक कथा आहेत. धनखर यांचा अचानक आलेला राजीनामा आणि वेळेची निवड या दोन्ही गोष्टी अनेक कथा, अनेक गोष्टी सांगतात. या राजीनाम्यामागील कारण खूप खोल आहे आणि फक्त पंतप्रधान किंवा जगदीप धनखरजी खरं काय ते सांगू शकतील, असंही हरीश रावत म्हणाले.

Q

जयदीप धनखड यांच्या राजीनाम्याची चर्चा का सुरू झाली?

A

त्यांच्या प्रकृतीबाबतच्या चर्चांमुळे आणि राजकीय हालचालींमुळे त्यांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Q

जयदीप धनखड यांची प्रकृती खरोखरच बिघडली आहे का?

A

याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र काही सूत्रांचा दावा आहे की ते वैद्यकीय उपचार घेत आहेत.

Q

हा राजीनामा भाजपच्या अंतर्गत रणनीतीचा भाग आहे का?

A

काही राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की मोठ्या फेरबदलाचा भाग असू शकतो.

Q

जयदीप धनखड यांच्या जागी कोणाची नियुक्ती होऊ शकते?

A

अजून कोणतेही नाव निश्चित झालेले नाही, मात्र काही माजी सचिव किंवा मंत्री यांची नावं चर्चेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com