Veteran CPI(M) leader Sunil Singh remembered by party workers during a tribute meeting in Purnia. saam tv
देश विदेश

माकपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकारणात शोककळा

Sunil Singh CPI(M) Leader Death News Bihar: माकपचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा सचिव सुनील सिंह यांचे निधन झाले असून पक्षात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे संघटनेला मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

Omkar Sonawane

बिहार: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा सचिव सुनिल सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पक्षात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने संघटनेला मोठी हानी झाल्याचे माकपने म्हटले आहे.

सुनिल सिंह हे माकपाचे माजी आमदार अजीत सरकार यांचे निकटवर्तीय होते. त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच अनेक वर्षांपासून पक्ष मजबूत व्हावा म्हणून तळागळात जाऊन प्रचार केला. अजित सरकार यांच्या निधनानंतर त्यांनी माकपकडून पुर्णीया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. याशिवाय ते पूर्णियामधून तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. माकपाचे विद्यमान जिल्हा सचिव तसेच जिल्हा परिषद सदस्य राजीव सिंह यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

त्यांनी म्हटले की, सुनिल सिंह यांचे निधन हे पक्षासाठी आणि वैयक्तिकदृष्ट्याही मोठे नुकसान आहे. दिवंगत नेत्यांचे मार्गदर्शन आणि संघर्षमय जीवन हे पक्ष कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. श्रद्धांजली सभेत डॉ. मनोज सिंह, सुदीप सरकार, रंजीत पाल, लालबहादूर उरांव, चंदन उरांव, सुधिलाल मुंडा, नारायण राम, मो. लुकमान, रत्नेश दास यांसह मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्त्यांनी पुष्पांजली अर्पण करत दिवंगत नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खड्ड्यांमुळे चाकणमधील उद्योग जाणार, 4 हजार कुटुंब रस्त्यावर येणार

नेत्यांच्या काड्या, शिवसेना फोडा, शिवसेना सरदारांचाच एकमेकांवर गद्दारीचा आरोप

Fact Check: सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप? विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाची नवी योजना?

महाराष्ट्रात 5 वर्षांत 36,000 कंपन्या बंद, केंद्र सरकारची लोकसभेत धक्कादायक माहिती

देवेंद्रदारी वर्षा बंगल्यावर 'राज'कारण, दोन्ही नेत्यांमध्ये 'वर्षा'वर खलबतं?

SCROLL FOR NEXT