VETERAN BJP LEADER MUKUTDHARI MAHTO DIES IN KOLKATA saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; खासदार, आमदार आणि कायदेतज्ञ अंत्यविधीला उपस्थित, राजकीय वर्तुळात शोककळा

Mukutdhari Mahto Death News And Funeral In Harli: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक मुकुटधारी महतो यांचे कोलकाता येथे उपचारादरम्यान निधन झाले. हरली येथील नदीकाठच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Omkar Sonawane

कोलकाता येथे उपचार सुरु असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक मुकुटधारी महतो यांचे मंगळवारी रात्री 10.45 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच परिसरात शोककळा पसरली. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर हरली येथील नदीकाठच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकुटधारी महतो यांच्या अंत्ययात्रेत माजी खासदार भुवनेश्वर मेहता, बटवेश्वर मेहता, हाकिम महतो, कुशवाह स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष जय कुशवाहा, सम्राट सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर.सी. मेहता, वकील तथा माजी बार असोसिएशनचे अध्यक्ष शंभू प्रसाद, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते प्रणव वर्मा आणि भाजपचे इंदर नारायण कुशवाह यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.

यावेळी आमदार रोशन लाल चौधरी, माजी खासदार भुवनेश्वर प्रसाद मेहता, माजी आमदार लोकनाथ महतो, विभावि विद्यापीठाचे कुलसचिव सुरेंद्र प्रसाद कुशवाहा, डॉ.कीर्तीनाथ महतो, टुकेश्वर प्रसाद, डॉ. बालेश्वर महतो,रामलखन महतो, मुखिया रंजीत कुमार, कविता देवी, अनिरुद्ध कुमार, अख्तर हुसैन, उमेश दांगी, बीगेश्वर महतो, जय नारायण प्रसाद, संजय कुमार, सहेश कुमार, उपेंद्र प्रसाद आणि महेंद्र महतो यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला.

मुकुटधारी महतो यांच्या निधनामुळे भाजपसह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचं शेतीच्या बांधावर आमरण उपोषण

Fast charging: फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी खराब होते? जाणून घ्या

Raw Vegetables: या 5 भाज्या चुकूनही कच्च्या खाऊ नका! आरोग्यासाठी ठरू शकतात अत्यंत घातक

PF Nominee Rules: PF खात्यात नॉमिनी नसेल तर पैसे कोणाला मिळतात? जाणून घ्या 'हा' नियम

NO UPI Day : मोठी बातमी! २ ऑक्टोबरला देशभरात NO UPI DAY; व्यापाऱ्यांनी का घेतलाय हा निर्णय?

SCROLL FOR NEXT