राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतात विलीन; राजकारणात शोककळा

Madan Bafna Former Maharashtra Minister Death News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन बाफना यांचे वयाच्या ८६व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
MADAN BAFNA DEATH
MADAN BAFNA DEATHsaam tv
Published On

दिलीप कांबळे, साम टीव्ही

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन बाफना यांच्या अकाली निधनाने मावळ तालुक्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आयुष्यभर समाजकारणाचा वसा जपणारे बाफना हे केवळ एक नेते नव्हते, तर अनेक दिग्गजांचे निकटचे स्नेही आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक होते. महाविद्यालयीन जीवनातही शरद पवार आणि मदन बाफना सोबतच होते. वर्गमित्रही राहिले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षीही त्यांचं अल्पशा आजारांनी दुःखद निधन झाले.

अल्पसंख्याक माध्यमातून पुढे येत त्यांनी मावळ तालुक्यात काँग्रेसची विचारधारा रुजवली आणि जपली. ​विविध पदांवर त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्यमंत्री म्हणून मोलाचे योगदान दिले. माजी मंत्री मदन बाफना यांनी मावळ तालुक्याच्या विकासात आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात मोठे योगदान दिले होते.

MADAN BAFNA DEATH
राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

माजी मंत्री मदन बाफना यांनी तळागाळातील माणसाला सोबत घेऊन केलेले समाजकार्य आणि त्यांनी जपलेली विचारधारा हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या जाण्याने बाफना कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण राजकीय आणि सामाजिक क्षेत्र सहभागी आहे.

MADAN BAFNA DEATH
पुणेकरांचा 'आधार' हरपला! जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्याचं निधन, राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी

मंत्री छगन भुजबळ यांनी केले दु:ख व्यक्त

महाराष्ट्राचे माजी महसूल, नगरविकास, अर्थ तसेच विधी व न्याय राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मदनजी बाफना यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक जीवनाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. १९६७ मध्ये एलएल.बी. पदवी प्राप्त केल्यानंतर केवळ वकिलीच्या क्षेत्रात न जाता त्यांनी जनसेवेचा मार्ग स्वीकारला. काँग्रेस पक्षापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्यांमधून समृद्ध झाला होता. दोन वेळा आमदार म्हणून तसेच दोन वेळा राज्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

आपल्या पहिल्याच आमदारकीच्या कार्यकाळात त्यांच्या अभ्यासू आणि संसदीय कार्यपद्धतीची दखल घेत त्यांची सभापती तालिकेवर निवड झाली होती. ही त्यांच्या संसदीय कौशल्याची साक्ष होती. आदरणीय वसंतदादा पाटील आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेत संस्थापक सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या विचारांची, कार्याची आणि जनसेवेची परंपरा सदैव स्मरणात राहील. बाफना परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि बाफना परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. अशी भावनिक पोस्ट छगन भुजबळ यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com