पुणेकरांचा 'आधार' हरपला! जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्याचं निधन, राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी

Asha Buchke death : जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आक्रमक महिला नेतृत्व आशा बुचके यांचे निधन झाले. पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या म्हणून त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला.
Asha Buchke former Pune Zilla Parishad group leader dies
Asha Buchke former Pune Zilla Parishad group leader diesSaam
Published On

रोहिदास घाडगे, पुणे प्रतिनिधी

Asha Buchke former Pune Zilla Parishad group leader dies : जुन्नर तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या आक्रमक कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचके यांचे दुःखद निधन झाले आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या आणि प्रशासनावर आपल्या अभ्यासपूर्ण भूमिकेने दबाव निर्माण करणाऱ्या या धडाडीच्या महिला नेतृत्वाच्या निधनाने संपूर्ण पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

पुणे जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषदेच्या गटनेत्या असा आशा बुचके यांचा राजकीय प्रवास राहिला. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी जुन्नरमधून कडवी झुंज दिली होती. शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी पुढे भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षाच्या पलीकडे जाऊन सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभे राहणे हीच त्यांच्या राजकारणाची खरी ओळख राहिली.

आरोग्य, शिक्षण, पाण्याचा प्रश्न असो किंवा गावपातळीवरील एखादा वाद... सामान्य माणूस आपली समस्या घेऊन आशा बुचके यांच्याकडे गेला, की त्यावर तोडगा काढण्यासाठी त्या स्वतः पुढाकार घेत असत. अनेक लोकप्रश्न प्रशासकीय पातळीवर मांडून त्याचा यशस्वी पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी होती. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेसाठी त्या केवळ एक राजकीय नेत्या नव्हत्या, तर संकटाच्या काळात पाठीशी उभा राहणारा भक्कम आधार होत्या.

Asha Buchke former Pune Zilla Parishad group leader dies
Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराचा त्यांना दांडगा अनुभव होता. प्रशासकीय यंत्रणेची जाण, नियमांची पक्की माहिती आणि नेमका मुद्दा हेरून तो सभागृहात मांडण्याची त्यांची शैली अत्यंत लक्षवेधी होती. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठकांमध्येही त्या अत्यंत आक्रमकपणे लोकप्रश्न मांडत असत. विकासनिधी असो वा तालुक्यातील मूलभूत सुविधांचा प्रश्न, संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारताना त्यांचा ठाम आवाज सभागृहात घुमत असे.

Asha Buchke former Pune Zilla Parishad group leader dies
Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

जिल्हा परिषद सभागृहातील त्यांचा दरारा हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा महत्त्वाचा भाग ठरला. एखाद्या प्रश्नावर भूमिका घेतल्यानंतर तडीस नेईपर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती होती. एक महिला म्हणून राजकारणात अनेक आव्हानांचा सामना करत असतानाही, त्यांनी कधीही मागे न हटता जनतेच्या हक्कासाठी संघर्ष केला.

राजकारणात आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेची समीकरणे बदलत राहिली, तरीही सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी लढणारी 'आक्रमक महिला नेत्या' ही त्यांची ओळख कायम राहिली. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्याने केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व गमावलेले नाही, तर जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारा एक खंबीर आधार गमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com