VENEZUELA EARTHQUAKE DISASTER: OVER 10,000 FEARED DEAD AFTER TWIN POWERFUL QUAKES Saam tv
देश विदेश

Earthquake : हाहाकार! भूकंपाच्या धक्क्याने 'हा' देश हादरला; १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

Venezuela Earthquake Death News : व्हेनेझुएला भूकंपाने हादरलं. ७.१ आणि ७.५ रिश्टर स्केलच्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे हजारो इमारती कोसळल्या असून १० हजारांहून अधिक मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Alisha Khedekar

  • व्हेनेझुएलामध्ये २६ वर्षांनंतर भीषण भूकंप

  • एका मिनिटाच्या अंतराने ७.१ आणि ७.५ रिश्टर स्केलचे दोन भूकंप

  • १० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू

  • बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Venezuela Earthquake Death Update दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात तब्बल २६ वर्षांनंतर भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने ७.१ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप झाल्याने देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो इमारती, घरे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा कोसळल्या असून मृतांचा आकडा १० हजारांहून अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात विध्वंसक भूकंप झाला. या देशात तब्बल २६ वर्षानंतर एवढं मोठं संकट आल्याचं म्हटलं जात आहे. या भूकंपात १ २ नाही तर तब्बल १० हजारापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. भूकंपाचे केंद्र व्हेनेझुएलाच्या उत्तरेकडील भागात असल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की अनेक शहरांमध्ये नागरिक घराबाहेर पळत सुटले. काही भागांमध्ये रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या असून वीजसेवा खंडित झाल्या आहेत. त्यामुळे बचावकार्य करताना प्रशासनास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि लष्कराने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष पथक युद्धपातळीवर कार्यरत आहेत. रुग्णालयांमध्ये जखमींची मोठी गर्दी झाली असून वैद्यकीय सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. भूकंपामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत.

अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी सरकारकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. भूकंपानंतर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. या भीषण आपत्तीमुळे संपूर्ण देश हादरला असून मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! 12 तासांचा प्रवास आता होणार 2 तासांत? या ठिकाणी धावणार नवीन बुलेट ट्रेन

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

SCROLL FOR NEXT