केंद्र सरकारकडून ‘वंदे मातरम्’बाबत घेतला मोठा निर्णय
‘वंदे मातरम्’बाबत नवीन गाईडलाईन्स जारी
सरकारी कार्यक्रमांमध्ये संपूर्ण सहा कडवी गाणे अनिवार्य
राष्ट्रगीताप्रमाणेच सावधान स्थितीत उभे राहणे आवश्यक
केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' बाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 'जन गण गन' या राष्ट्रगीताप्रमाणे वंदे मातरम हे राष्ट्रगीत आता सरकारी कार्यक्रमांमध्ये वाजवणे अनिर्वाय करण्यात आले आहे. यापुढे सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये या गीताची संपूर्ण सहा कडवी गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. राष्ट्रगीताप्रमाणेच आता 'वंदे मातरम्' सुरू असताना सर्वांना सावधान स्थितीत उभे राहावे लागणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या निर्देशात असे म्हटले आहे की, 'वंदे मातरम्'चे ३.१० मिनिटांचे हे सहा श्लोक असलेली आवृत्ती अनेक अधिकृत प्रसंगी वाजवले किंवा गायले पाहिजे. ज्यामध्ये तिरंगा फडकवताना, सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींचे आगमन होताना, त्यांची भाषणे आणि राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी आणि नंतर तसेच राज्यपालांचे आगमन आणि भाषणे त्याआधी आणि त्यानंतर यांचा समावेश असेल.
२८ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने 'वंदे मारतम्' बाबत १० पानांचे निर्देश जारी केले. यात गृह मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, जर राष्ट्रगीत 'वंदे मातरम्' आणि राष्ट्रगीत 'जन गण मन' एकाच वेळी गायले किंवा वाजवले गेले तर प्रथम 'वंदे मातरम' वाजवावे. वंदे मारतम् हे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर सर्वांना लक्षपूर्वक उभे राहावं लागेल.
बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या या अजरामर गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा मोठा बदल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आला आहे. यापूर्वी केवळ ठराविक भाग गायला जात असे, मात्र आता पूर्ण गीत वाजवले अथवा गायले जाणार आहे. देशभक्तीच्या भावनेला अधिक बळ देण्यासाठी आणि गीताचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे आता सरकारी शिष्टाचारात मोठा बदल होणार असून सर्व नागरिकांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.