

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपतींचं संबोधन
राष्ट्रपती मुर्मू यांनी दिल्या भारतवासीयांनी शुभेच्छा
भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यावर मुर्मू यांचं भाष्य
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे रविवारी जनतेला संबोधित केलं. राष्ट्रपती मुर्मू यांनी जनतेला प्रजाकसत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'भारतीय लोक आता देश आणि परदेशातही उत्साहाने प्रजाकसत्ताक दिन साजरा करणार आहे. प्रजासत्ताक दिन भारताचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याची स्थिती आणि दिशा काय असेल, याचा विचार करण्याची संधी देते, असे ते म्हणाले.
'15 ऑगस्ट १९४७ रोजी भारताची स्थिती बदलली. त्या दिवशी भारत स्वातंत्र्य झाला. आपण ब्रिटिशांची गुलामी नाकारली. त्यानंतर २६ जानेवारी १९५० सालापासून संविधानाच्या मार्गाने देशाला पुढे नेत आहोत. त्या दिवसापासून संविधान पूर्णपणे लागू झालं, असे त्या म्हणाल्या.
'भारत लोकशाहीची जन्मभूमी आहे. आपण लोकशाही स्वीकारली. आपलं संविधान विश्वातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. संविधानात न्याय, स्वातंत्र्यता, समानता आणि बंधुत्व या सारख्या आदर्शांचा समावेश आहे, असेही ते मुर्मू यांनी म्हटलं.
'राष्ट्रीय महाकवी सुब्रमण्यम भारती यांनी तामिळ भाषेत 'वंदे भारत येन्बोम' म्हणजे 'आपण वंदे भारत म्हणुया' या गाण्याची गीतरचना करून वंदे मातरम ही भावना आणखी व्यापक पातळीवर लोकांशी जोडली. इतर भाषेतील गीताचं अनुवाद लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. श्री ऑरबिंदो यांनी वंदे मातरम गीताचं इंग्रजी भाषेत अनुवाद केला.
'दोन दिवसांपूर्वी २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतात २००१ सालापासून नेताजींच्या जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी केली जाते. भारताची तरुण मंडळी नक्कीच त्यांच्याकडून देशभक्तीपासून प्रेरणा घेऊ शकेल, असे ते पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.