2400000 लाडक्या बहि‍णींचे लाभ बंद; E-KYC करताना एका प्रश्नाने घोळ केला, तुम्ही ही चूक केली नाही ना?

Ladki Bahin Yojana eKYC Error : राज्यात 2400000 लाडक्या बहि‍णींचे लाभ बंद करण्यात आले आहेत. E-KYC करताना एका प्रश्नाने हा घोळ केल्याचे समोर आलं आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana eKYC ErrorSaam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेचे लाखो महिलांचे लाभ बंद

लाभ बंद झाल्याने लाभार्थी महिला आक्रमक

ई-केवायसी करताना केलेल्या चुकीने लाभ झाल्याचा दावा

Ladki Bahin Yojana eKYC : महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेचे लाभ लाखो महिलांना मिळेना झाले आहेत. महिन्याला बँक खात्यात येणारे १५०० रुपये बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. ई-केवायसी करताना केलेल्या चुकीमुळे महिलांना लाभांपासून वंचित राहावे लागत आहेत. अर्ज भरताना केलेली चूक सुधारण्यासाठी सरकाराकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana
'लेडी बॉस'च्या मृत्यूचं गूढ उलगडलं; कर्मचाऱ्यानेच पेट्रोलने टाकून जाळलं अन् रचला अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण समोर

मीडिया रिपोर्टनुसार, महिला आणि बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसी फॉर्म भरताना एका प्रश्नामुळे अनेकांचा गोंधळ उडाल्याचे समोर आलं आहे. फॉर्म भरताना सरकारी नोकरीविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे अनेकांचं लाभ बंद झाले आहेत. 'तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना?' असा प्रश्न फॉर्ममध्ये विचारण्यात आला होता.

Ladki Bahin Yojana
ठरलं! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महौपार; मुंबईचं काय?

फॉर्ममध्ये विचारण्यात आलेल्या या प्रश्नाने अनेक महिलांना गोंधळात टाकल्याचे बोललं जात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना अनेकांनी 'नाही' ऐवजी 'हो' या पर्यायावर टिक केल्याचे समोर येत आहे. या प्रश्नाच्या उत्तरामुळे अनेक लाभार्थी महिलांच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी आहेत, असा अर्थ सिस्टिमने घेतला. यामुळेच तब्बल २४ लाख महिलांचे लाभ बंद करण्यात आल्याची चर्चा आहे.

महिला आणि बालविकास विभागाच्या डेटानुसार, २४ लाख महिलांनी कुटुंबात सरकारी नोकरदार असल्याचे नमूद केलेय. परंतु महाराष्ट्रात सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांची संख्या ही ८ ते ९ लाखांच्या आसपास आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याची दिसून आलीये.

Ladki Bahin Yojana
बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

राज्यभरात योजनेचा हप्ता जमा न झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सरकारने प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतल आहे. राज्यात बहुतांश लाभार्थी महिलांच्या ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. या अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष भेट देऊन लाभार्थी महिलांची कागदपत्रांची तपासणी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com