रेल्वे मंत्रालयाने आपल्या नवीन वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून ही ट्रेन वर्षाच्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पंजाबमधील रेल्वे कोच फॅक्टरी येथे तयार करण्यात आलेल्या या सेमी हाय स्पीड ट्रेनने वेस्ट सेंट्रल रेल्वेच्या कोटा विभागात चाचणीदरम्यान 180 किमी प्रति तास (180kmph) इतका वेग गाठला.
पंजाबच्या आरसीएफमध्ये तयार झालेली गू नवीन वंदे भारत ट्रेन एप्रिल महिन्यात बाहेर पडली होती. नियमित प्रवासी सेवेत सामील होण्यापूर्वी ट्रेनची राइड क्वालीटी, सुरक्षा मानके आणि डायनॉमिक परफॉर्मन्स तपासण्यासाठी ही चाचणी अत्यंत महत्वाची होती. रिसर्च डिझायन्स अँड स्टँडर्डस ऑर्गनायझेशन च्या टेस्टिंग डायरेक्टोरने ही चाचणी पार पाडली.
कोटा विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापन सौरभ जैन यांनी माहिती दिली की, कपूरथला येथील रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेल्या पहिल्या वंदे भारत ट्रेनसेटची स्पीड ट्रायल कोटा चौमहला कोटा सेक्शनवर यशस्वी झाली. या दरम्यान ट्रेनने 180 किमी प्रति तासाचा कमाल वेग गाठला.
या ट्रेनमध्ये प्रगत ट्रेन कंट्रोल आणि प्रोपल्शन सिस्टम बसवण्यात आली आहे. ज्याचा पुरवठा एल्सटॉम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड कडून करण्यात आला आहे. याआधी 160 किमी वेगापर्यंत नेण्यात आला आहे. जो भारतीय बनावटीच्या या ट्रेनसाठी एक मौलाचा ठरला आहे.
सध्या वंदे भारत एक्सप्रेस 8,16 आणि 20 अशा तीन वेगवेगळ्या कोच कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे.
आरामदायी प्रवास: एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या रिक्लिंग सीट्स आणि भरपूर लेगरूम
पॅनोरोमिक व्ह्यु : निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या खिडक्या केल्या आहेत जेणेकरून जास्त प्रमाणात प्रकाश आतमध्ये येईल.
सुरक्षा व्यवस्था: स्वदेशी बनावटीची 'कवच' (KAVACH) सुरक्षा यंत्रणा.
प्रगत दरवाजे: ऑटोमॅटिक स्लाइडिंग डोअर्स आणि सेंट्रली कंट्रोल्ड प्लग डोअर्स.
स्वच्छता: बायो-व्हॅक्युम टॉयलेट्स आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष स्वच्छतागृहे.
आधुनिक सस्पेंशन: प्रवास अधिक सुखकर व्हावा आणि झटके कमी बसावेत यासाठी विशेष सस्पेंशन सिस्टिम.
फायर सेफ्टी: इलेक्ट्रिक कॅबिनेट्स आणि टॉयलेट्समध्ये एरोसोल-आधारित फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टिम.
इतर सुविधा: सीसीटीव्ही कॅमेरे, UV-C लॅम्प आधारित निर्जंतुकीकरण प्रणाली आणि ड्रायव्हर-गार्ड कम्युनिकेशनसाठी व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधा.
१८० किमी प्रति तास डिझाइन स्पीड असलेल्या या ट्रेनमध्ये हाय एक्सीलरेशन (त्वरीत वेग घेण्याची क्षमता) असून, यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.