Vande Bharat Sleeper Train Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये जेवणात काय काय मिळणार? वाचा मेन्यू

Vande Bharat Sleeper Train Food: वंदे भारत स्लीपर ट्रेन आता सेवेत दाखल झाली आहे. हावडा ते कामाख्या असा प्रवास ही ट्रेन करणार आहे. या ट्रेनमध्ये जेवणात काय पदार्थ मिळणार ते जाणून घ्या.

Siddhi Hande

वंदे भारतची पहिली स्लीपर ट्रेन सेवेत

स्लीपर ट्रेनमध्ये जेवण काय मिळणार?

हावडा ते कामाख्यापर्यंत ट्रेन धावणार

भारतीय रेल्वेने एक नवीन ट्रेन आपल्या ताफ्यात सहभागी केली आहे. भारतीय रेल्वेत वंदे भारत स्लीपर ट्रेनचा समावेश झाला आहे. १७ जानेवारी रोजी या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा येथून सुटणार असून आसाममधीन कामाख्यापर्यंत धावणार आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनचा हा प्रवास ९५८ किलोमीटरपर्यंत लांब असणार आहे. या प्रवास १४ तासांचा असणार आहे. या प्रवासात तुम्हाला अनेक सुविधा मिळणार आहे. स्लीपर कोचसोबत जेवणासाठीही अनेक ऑप्शन मिळणार आहे.

आसामच्या एका हॉस्पिलिटी सर्व्हिस कंपनीने वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या कॅटरिंगचं कंत्राट घेतलं आहे. ही कंपनी वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रिमियम सर्व्हिसमध्ये चांगले जेवण-नाश्ता देणार आहेत. कॅटरिंग सर्व्हिस देणाऱ्या कंपनीचं नाव मेफेयर स्पिंग वॅली रिसॉर्ट असणार आहे.

गुवाहाटीच्या मेफेयर स्पिंग वॅली रिसॉर्टने सांगितले की, त्यांनी इंडियर रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझ्म कॉर्पोरेशनसोबत पार्टनरशिप केली आहे. या ट्रेनमध्ये पश्चिम बंगाल आणि आसाममधील पारंपारिक पदार्थ दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पारंपारिक जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.

वंदे भारत स्लीपर कोचमध्ये काय जेवण मिळणार? (Vande Bharat Sleeper Train Food)

तुम्हाला जेवणात बसंती पुलाव, चोलार, मूग डाळ, पनीर, ठोकर डाळना, आसामी जोहा भात, माती मोहोर आणि मसूर डाळ मिळणार आहे. याचसोबत हंगामी भाज्या असणार आहेत. त्याचसोबत बंगालची स्पेशल मिठाई सौंदेश, नारळ बर्फी, रसगुल्ला मिठाईदेखील मिळणार आहे. हे पदार्थ कमी मसालेदार आणि शाकाहाही असणार आहे. हंगामी पदार्थ पारंपारिक पद्धतीने हे पदार्थ बनवले जाणार आहेत.

ट्रेनची खासियत (Vande Bharat First Sleeper Train Features)

हावडा ते कामाख्या वंदे भारत ट्रेन १००० किमी अंतर कापणार आहे. यात १६ एसी कोच असणार आहे. यामध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसीचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये ८२३ प्रवासी बसू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express : महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत मिळणार? परळीकरांचे थेट रेल्वे विभागाला पत्र

Maharashtra Live News Update: उबाठाचे नगरसेवक नॉट रिचेबल नाहीत, 6 नगरसेवक पक्षाच्या कार्यलयात असल्याची माहिती

Crime News: महिलेसोबत डीजीपी ऑफिसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत दिसले, व्हिडिओ व्हायरल, नंतर आयपीएसकडून मोठा खुलासा अन्...; प्रकरण काय?

Thane Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार? ठाण्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट

एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या, घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह; प्रत्येकाच्या डोक्यात झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT