देव दिवाळीला काळाचा घाला, हावडा एक्सप्रेसने रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांना उडवले, ८ महिला भाविकांच्या चिंधड्या

Howrah-Kalka Express accident details : देव दिवाळीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. वाराणसीला गंगा स्नानासाठी जात असताना मिर्झापूर येथे रेल्वे रूळ पार करणाऱ्या ८ महिला भाविकांना हावडा एक्सप्रेसने चिरडले. २४ तासांत देशात दोन अपघातांत १९ जणांचा मृत्यू झाला.
Howrah-Kalka Express accident details
Howrah-Kalka Express accident detailsSaam TV Marathi News
Published On

Dev Diwali pilgrims run over by Howrah Express in Mirzapur : २४ तासात देशात झालेल्या दोन वेगवेगळ्या रेल्वेच्या अपघातात तब्बल १९ जणांचा (train accident in India kills 19 people in 24 hours) मृत्यू झालाय. छत्तीसगडमध्ये ११ तर उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू झालाय. मंगळवारी संध्याकाळी बिलासपूर स्टेशनजवळ दोन ट्रेनची जोरदार धडक झाली. त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरजवळ (Mirzapur Train Accident News) रेल्वे दुर्घटनेची धक्कादायक घटना घडली.

हावडा एक्सप्रेसने अनेक भाविकांना उडवले, त्यामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झालाय तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. धक्कादायक म्हणजे, देव दिवाळी निमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी जात असताना हावडा एक्सप्रेस काळ बनून आली. (Dev Diwali Tragedy: 8 Pilgrims Crushed by Howrah Express in Mirzapur, 19 Dead in 2 Train Accidents in 24 Hours)

Howrah-Kalka Express accident details
Gold Rate : ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त, चांदीचा भावही घसरला; वाचा २२ कॅरेट-२४ कॅरेटचे आजचे दर

देव दिवाळीनिमित्त वाराणसीला गंगा स्नान करण्यासाठी रेल्वे रूळ निघालेल्या भाविकांना हावडा एक्सप्रेसने चिरडले. मिर्झापूरजवळ चुनार रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रूळ पार करताना वेगात आलेल्या हावडा एक्सप्रेसने चिंधड्या केल्या. यामध्ये आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण वाराणसीकडे गंगेत स्नान करण्यासाठी निघाले होते. सर्वजण पेसेंजर ट्रेनने चुनारमध्ये पोहचले होते. वाराणसीसाठी ते दुसरी ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे रूळ पार करत होते. त्याचवेळी काळाने घाला घातला.

Howrah-Kalka Express accident details
Train Accident : अंगावर काटा आणणारा रेल्वे अपघात! पेसेंजर ट्रेन थेट मालगाडीवर चढली, लोको पायलटसह ११ प्रवाशांचा मृत्यू

मृतदेहाच्या तुकडे तुकडे -

हावडा-कालका या एक्सप्रेस ट्रेनने चुनारमध्ये रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या ८ महिला भाविकांना चिरडले. हावडा एक्सप्रेस अतिशय वेगात निघालेली होती, त्यामुळे ८ महिला दूर फेकल्या गेल्या. मृत देहाचे तुकडे तुकडे झाले. पटरीवर जिकडे तिकडे रक्ताचा सडा पडला होता. चुनार रेल्वे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला अन् एकच पळापळ झाली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस अन् बचावपथके घटनास्थळावर दाखल झाली. दुखापतग्रस्तांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलेय. मृताच्या नातेवाईंका मदतीचे अश्वासन दिलेय.

Howrah-Kalka Express accident details
Plane Crash : उड्डाण घेताच विमान कोसळले, ४ जणांचा मृत्यू; काळाकुट्ट धूर अन् आगीचे उंच लोळ, थरारक व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com