Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांना पालेभाज्या खाण्याचा कंटाळा येतो अशा वेळेस ते जेवतही नाहीत. तेव्हा पालक फार चिंतेत असतात. काही मुलं टिफीनसुद्धा परत आणतात.
तुम्ही आता चिंता सोडा, ही मेथीच्या पुलावची लहान मुलांपासून सगळ्यांसाठी ही रेसिपी ठरेल बेस्ट आणि बनवायलाही सोपी.
अर्धी वाटी मेथी दाणे दोन कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवा; त्यामुळे दाणे मऊ होतात आणि कटू चव कमी होते.
भिजलेले मेथी दाणे पाणी काढून किमान दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
एक कप तांदूळ धुऊन साधारण 10 मिनिटे पाण्यात भिजू द्या; यामुळे पुलाव अधिक मऊ-फुलका होतो.
तीन चमचे तूप कुकरमध्ये गरम करा. तूपामुळे पुलावाला उत्तम सुगंध येतो. गरम तुपात दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून परता. यामुळे मसाला हलका पण चवदार लागतो.
मिरच्यांचा सुगंध आल्यानंतर भिजलेले मेथी दाणे आणि तांदूळ यात घाला.
चवीनुसार मीठ घालून मिश्रण साधारण 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्या; यामुळे तांदूळ वेगळे आणि स्वादिष्ट होतात.
दोन ते तीन कप पाणी घालून कुकरचे झाकण लावा आणि दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा आणि सुगंधित मेथी पुलाव दही किंवा पापडासोबत गरमागरम सर्व्ह करा.