''लसीकरण म्हणजे वाढदिवसाला केक कापण्यासारखे नाही'' पी. चिदंबरम यांची टीका Saam Tv News
देश विदेश

''लसीकरण म्हणजे वाढदिवसाला केक कापण्यासारखे नाही'' पी. चिदंबरम यांची टीका

भाजप शासित राज्ये ज्यात यूपी, एमपी, गुजरात ही पंतप्रधानांच्या वाढदिवसाला अधिक लसीकरण करतात आणि इतर दिवशी, लसीकरच्या बाबतीत ते "नॉन-परफॉर्मिंग" राज्य आहेत, असंही चिदंबरम म्हणाले.

विहंग ठाकूर

नवी दिल्ली: काल १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७१ वा वाढदिवस होता. याप्रसंगी देशानं एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला तो म्हणजे एका दिवसांत सुमारे २.५ कोटी जनतेचे कोविड लसीकरण करुन. या एकाच दिवशी देशात अडीच कोटी जनतेला कोरोना लस टोचण्यात आली. यावरुन आता राजकारणही सुरु झालंय. मोदींच्या वाढदिवशीच जास्त लसीकरण आणि इतर दिवशी कमी लसीकरण यावर आता अनेकांनी टीका केली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीदेखील या प्रकाराबाबत मोदींवर टीका केली आहे. ("Vaccination is not like cutting a birthday cake." Criticism of Chidambaram)

हे देखील पहा -

मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी विक्रमी लसीकरण करण्यावरून काँग्रेस नेते पी.  चिदंबरम  यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, ''अडीच कोटी  लोकांचे लसीकरण एका दिवसात करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाची वाट का पाहावी लागली? भाजपशासित राज्ये ज्यात यूपी, एमपी, गुजरात ही पंतप्रधानांच्या वाढदिवसाला  अधिक लसीकरण करतात आणि  इतर दिवशी, लसीकरच्या बाबतीत ते "नॉन-परफॉर्मिंग" राज्य आहेत.''

पुढे चिदंबरम यांनी टोला  लगावत  म्हंटले कि, ''माझी इच्छा आहे की, पंतप्रधानांनी त्यांचा वाढदिवस दररोज साजरा करावा. पंतप्रधानांचा वाढदिवस 31 डिसेंबर रोजी असता, तर 2.5 कोटी लसीकरण केवळ वर्षाच्या शेवटच्या दिवशी केले गेले असते का? लसीकरण म्हणजे वाढदिवसाला केक कापण्यासारखे नाही. लसीकरण हा एक कार्यक्रम आहे, ती एक प्रक्रिया आहे. वाढदिवसाच्या दिवशी शिखर गाठण्याऐवजी त्याला दररोज गती द्यावी लागते.'' असा टोला चिदंबरम यांनी मोदींना लगावला आहे.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या दरम्यान देशात लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. शुक्रवारी केवळ 17 तासात 2.5 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. कोरोना लस 2,51,21,261 लोकांना रात्री 1 पर्यंत देण्यात आली, म्हणजेच 14.77 लाख लोकांना दर तासाला कोरोनाची लस देण्यात आली. देशात 1,09,686 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शनमोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

Manoj Jarange Patil: हवं तर गोळ्या घाला’; जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, सरकारवर आडकाठीचा आरोप

SCROLL FOR NEXT