Uttarakhand Dehradun 6 Days Old Baby News Saam TV
देश विदेश

Dehradun News: आई-वडिलांच्या मृतदेहाजवळ सापडलं ६ दिवसांचं जिवंत बाळ; ३ दिवस उपाशीपोटीच जगलं, मन सुन्न करणारी घटना

Dehradun 6 Days Old Baby News: किमान तीन दिवसांपूर्वी या जोडप्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. तीन दिवसांपासून हे बाळ आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारीच अन्नपाण्याशिवाय जगले.

साम टिव्ही ब्युरो

Uttarakhand Dehradun News: उत्तराखंडमधील डेहरादूनमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका घरात पती-पत्नीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहाजवळ पोलिसांना अवघ्या ६ दिवसांचं जिवंत बाळ आढळून आलं. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

किमान तीन दिवसांपूर्वी या जोडप्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. तीन दिवसांपासून हे बाळ आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारीच अन्नपाण्याशिवाय जगले. पोलिसांनी या बाळाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, सध्या बाळ सुरक्षित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 13 जून रोजी पोलीस (Police) कंट्रोल रुमला टर्नर रोडवरील एका घरातून खूप दुर्गंधी येत असल्याचा फोन आला. माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे प्रमुख आपल्या टीमसह टर्नर रोडवरील C13 घराजवळ पोहोचले. एक दरवाजा बाहेरून बंद होता तर दुसऱ्या दाराला आतून कडी लावली होती.

पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, त्यांना पती-पत्नीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेहाशेजारीच पोलिसांना ६ दिवसांचं बाळ जिवंत अवस्थेत सापडलं. पोलिसांनी तातडीने या बाळाला रुग्णवाहिकेतून (Hospital) रुग्णालयात पाठवलं.

पोलिसांनी मृत पती-पत्नीचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छदानासाठी रुग्णालयात पाठवले. दोन्ही मृतदेहांवर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. तरुणाने कर्ज घेतलं होतं, ते फेडू न शकल्याने त्याने पत्नीसह आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवली असून काशिफ (वय २५) आणि अनम (वय २२) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. दोघेही चार महिन्यांपूर्वीच या घरात किरायाने राहायला आले होते. मृताच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले असता, काशिफचे दोनदा लग्न झाल्याचे समजले. पहिल्या लग्नापासून काशिफला ५ वर्षांची मुलगी आहे. तर, वर्षभरापूर्वी त्याने अनम नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला संधी, कुणाला मिळाला डच्चू? IND vs UAE सामन्यात अशी आहे टीम इंडियाची Playing XI

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT