Kushinagar Fire Tragedy: भयंकर! पती अंगणात झोपलेला, मध्यरात्री घराला भीषण आग; पत्नीसह ५ मुलांचा होरपळून मृत्यू

Uttar Pradesh News: रामकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उर्धा गावातील एका घराला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत एका महिलेसह ५ मुलांचा होरपळून मृत्यू झाला.
Uttar Pradesh News house catches fire 5 kids and women death in kushinagar
Uttar Pradesh News house catches fire 5 kids and women death in kushinagarSaam TV
Published On

Uttar Pradesh Kushinagar Fire Tragedy: उत्तरप्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. रामकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उर्धा गावातील एका घराला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत एका महिलेसह ५ मुलांचा होरपळून मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

Uttar Pradesh News house catches fire 5 kids and women death in kushinagar
Monsoon Rain Update: बिपरजॉय चक्रावादळाने टेन्शन वाढवलं; मान्सूनच्या सरी कधी बरसणार? हवामान खात्याकडून नवी अपडेट

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह (Police) अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाने शर्थीने प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आगीत होरपळलेल्या ६ जणांची मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रामकोला नगरमधील (Uttar Pradesh) उर्धा क्रमांक दोनमध्ये नवमी नामक व्यक्ती बुधवारी रात्रीचे जेवण करून घराबाहेर झोपला होता. तर त्याची पत्नी संगीता, मुलगा अंकित, लक्ष्मीना, रिटा, गीता आणि बाबूसह घरात झोपली होती.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घराला आग लागली. आगीच्या ज्वाला भडकलेल्या पाहून नवमीला जाग आली. त्याने आरडाओरड करीत गावातील नागरिकांना मदतीसाठी हाक दिली. नागरिकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Uttar Pradesh News house catches fire 5 kids and women death in kushinagar
Petrol Diesel Price: आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? नवीनतम दर तपासा

मात्र, क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केलं आणि संपूर्ण घराला विळखा पडला. कालव्याच्या काठावर एकाकी घर असल्याने लवकर मदत मिळाली नाही. त्यामुळे आग संपूर्ण घरात पसरली. घरातील संगीता (वय 38 वर्ष), तिची मुले 10 वर्षांचा अंकित (वय 10 वर्ष), लक्ष्मीना (वय 9 वर्ष) रीता (वय 3 वर्ष) गीता (वय 2 वर्ष) आणि एक वर्षीय चिमुकला बाबू यांचा होरपळून मृत्यू झाला.

आगीची माहिती मिळताच रामकोला पोलीस ठाण्याचे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली आणि सर्व मृतदेह बाहेर काढले. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com