Petrol Diesel Price: आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? नवीनतम दर तपासा

Petrol Diesel News: कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून येत आहे.
Petrol Diesel Price
Petrol Diesel Price Saam Tv
Published On

Petrol Diesel Price Today 15 June: कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून येत आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड ७० डॉलरच्या आसपास पोहोचले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहे.  (Latest Marathi News)

Petrol Diesel Price
Kalyan Crime News: रात्री रस्त्यात एकट्याला गाठून करायचे शस्त्राने हल्ला; पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळत संपविली दहशत

यूपीच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) जिल्ह्यात आज सकाळी पेट्रोल (Petrol) १८ पैशांनी महाग झाले असून ९६.७६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. येथे डिझेलही १८ पैशांनी वाढून ८९.९३ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. गाझियाबादमध्ये आज पेट्रोल १४ पैशांनी स्वस्त झाले आणि ते ९६.४४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल (Diesel) १३ पैशांनी घसरले असून ८९.६२ रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Price
Eknath Shinde News: मराठी रंगभूमीचा चेहरामोहरा बदलणार; राज्यातील नाट्यगृहांसाठी CM शिंदेंची मोठी घोषणा

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com