Monsoon Rain Update: बिपरजॉय चक्रावादळाने टेन्शन वाढवलं; मान्सूनच्या सरी कधी बरसणार? हवामान खात्याकडून नवी अपडेट

Maharashtra Rain Updates: मान्सूनच्या पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम होत आहे.
Monsoon in Maharashtra
Monsoon in MaharashtraSaam TV
Published On

Monsoon in Maharashtra: मान्सूनच्या पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम होत आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरीपर्यंत पोहचलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) पुढील चाल मंदावली आहे. १८ ते २१ जूनदरम्यान त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. (Latest Marathi News)

Monsoon in Maharashtra
Maharashtra Politics: ५० कुठं आणि १०५ कुठं?, देवेंद्र फडणवीस बस नाम ही काफी है; भाजपने शिंदे गटाला पुन्हा डिवचलं

दरवर्षीच्या तुलनेत यंदा मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले. देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये मॉन्सून तब्बल ७ दिवस उशीराने दाखल झाला. त्यानंतर १० जून मॉन्सूनने केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीवर मॉन्सूनने (Monsoon) धडक दिली.

त्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनने ११ जूनला धडक दिली. कोकणातील रत्नागिरीपर्यंत पोहचलेला मान्सून लवकरच संपूर्ण राज्याला व्यापून टाकेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात अद्याप फार प्रगती झालेली नाही.

चक्रीवादळाने आर्द्रता खेचून घेतल्याने सध्या राज्यात फारसा पाऊस  (Rain Alert) नाही. त्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी १८ जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असंही हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

Monsoon in Maharashtra
Gunratna Sadavarte on Sharad Pawar: शरद पवार हे वैचारिक व्हायरस; गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर टीका

शेतकऱ्यांनी पावसाच्या या स्थितीवर अवलंबून पेरणीपूर्वीची शेतीची मशागत कामे करावीत, असंही तज्ञ्जांनी सांगितलं आहे. दरम्यान, मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या आणखी काही भागांत १८ ते २१ जून दरम्यान मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी

दरम्यान, मान्सून पूर्णपणे महाराष्ट्रात दाखल झाला नसला तरी, सध्या मुंबईसह (Mumbai Rain) उपनगरात अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व पावसाचे संकेत आहेत. उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपर्यंत सर्वदूर पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com