Uttarakhand government reshuffles responsibilities of 3 IAS officers saam tv
देश विदेश

अचानक 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

Uttarakhand Ias Officers Transfer New Appointments Administrative Reshuffle: उत्तराखंड सरकारच्या मोठ्या प्रशासकीय फेरबदलात 3 IAS आणि 3 PCS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांत बदल करण्यात आला. विजय कुमार जोगदंडे, डॉ. आनंद श्रीवास्तव आणि विनोद गिरी गोस्वामी यांना नव्या जबाबदाऱ्या.

Omkar Sonawane

उत्तराखंड सरकारने मंगळवारी मध्यरात्री तीन IAS आणि तीन PCS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल केले. या आदेशात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र बदलण्यात आले असून काहींकडे अतिरिक्त जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या आहेत. IAS-2012 बॅचचे अपर सचिव विजय कुमार जोगदंडे यांच्याकडे गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. जोगदंडे यांच्याकडे यापूर्वी अपर सचिव-आयुष आणि आयुष शिक्षण, निवडणूक विभाग, स्टाफ ऑफिसर-मुख्य सचिव तसेच अपर मुख्य निवडणूक अधिकारी या जबाबदाऱ्या आहेत.

तर IAS-2013 बॅचचे डॉ. आनंद श्रीवास्तव यांना अपर सचिव-नागरी विमान वाहतूक आणि महानिदेशक-कृषी आणि उद्यान विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे अपर सचिव-कृषी अन् कृषक कल्याणची जबाबदारीही कायम आहे. मात्र, त्यांच्याकडील महसूल विभागाच्या अपर सचिवपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. IAS-2017 बॅचचे विनोद गिरी गोस्वामी यांच्याकडून अपर सचिव-गृहनिर्माण विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. मात्र, अपर सचिव-नगरी विकास, संचालक-नगरी विकास संचालनालय, देहरादून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी-भागीरथी नदी घाटी विकास प्राधिकरण या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे कायम राहतील.

PCS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांतही बदल

PCS अधिकारी सुंदर लाल सेमवाल यांच्याकडून अपर सचिव-समाज कल्याण विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे अपर सचिव-सचिवालय प्रशासन विभाग, व्यवस्थापकीय संचालक-बहुउद्देशीय वित्त विकास निगम तसेच दिव्यांगजन आयुक्त, उत्तराखंड या जबाबदाऱ्या कायम राहतील. सचिवालय सेवेत कार्यरत सुनील सिंह यांच्याकडून अपर सचिव-गृह विभागाची जबाबदारी काढून घेऊन त्यांना अपर सचिव-गृहनिर्माण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे अपर सचिव विभागाचा कार्यभारही कायम राहणार आहे.

तसेच PCS अधिकारी महिमा रौंकली यांना सचिवालय सेवेत अपर सचिव-राजस्व आणि सैनिक कल्याण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या फेरबदलामुळे उत्तराखंडच्या प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वपूर्ण बदल झाले असून विविध विभागांच्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा

Cholesterol : सुका मेवा हृदयासाठी धोकादायक? 'या' ५ सवयींमुळे वाढू शकतो कोलेस्ट्रॉलचा धोका

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर! मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून २ दिवसासाठी अलर्ट

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT