Salt- Sleep : जेवणात जास्त मीठ खाताय? रात्रीच्या झोपेवर होऊ शकतो गंभीर परिणाम

Shreya Maskar

अतिरिक्त मीठ

आपल्या रोजच्या आहारात मीठाला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, गरजेपेक्षा जास्त मीठ खाण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अतिरिक्त मीठ सेवनाचा झोपेवरही अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.

Excess Salt | pinterest

रात्री वारंवार तहान लागणे

जेवणात जास्त मीठ खाल्ल्यास शरीराला अधिक पाण्याची गरज भासू शकते. त्यामुळे रात्री वारंवार तहान लागते आणि पाणी पिण्यासाठी झोपमोड होऊ शकते.

Frequent Thirst at Night | pinterest

वारंवार लघवीला जाणे

रात्री जास्त पाणी प्यायल्यामुळे काही लोकांना वारंवार लघवीला जावे लागू शकते. परिणामी रात्रीची झोप पूर्ण होण्यात अडथळा निर्माण होतो.

Frequent Urination | pinterest

झोपेची गुणवत्ता खराब

रात्री तहान लागणे किंवा वारंवार जाग येणे यामुळे झोपेचे चक्र विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही.

Poor Sleep Quality | pinterest

झोपेत अस्वस्थता जाणवणे

अतिरिक्त मीठामुळे तहान, तोंड कोरडे पडणे आणि शरीरात पाणी साचणे अशा समस्या उद्भवू शकतात. यामुळे काही लोकांना रात्री आरामात झोपता येत नाही.

Restlessness During Sleep | pinterest

दिवसभर थकवा

रात्री वारंवार झोपमोड झाल्यास दुसऱ्या दिवशी थकवा, सुस्ती आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. त्यामुळे कामाच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.

Daytime Fatigue | pinterest

रक्तदाब वाढण्याचा धोका

अतिरिक्त सोडियम सेवनामुळे रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आहारातील मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे.

Blood Pressure | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : रात्री सारखे सारखे झोपेतून जागे होताय? असू शकतात 'ही' ५ कारणे

Sleep Problems | AI PHOTO
येथे क्लिक करा...