Sleep Problems : रात्री सारखे सारखे झोपेतून जागे होताय? असू शकतात 'ही' ५ कारणे

Shreya Maskar

रात्री वारंवार झोपमोड होणे

दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी पुरेशी झोप घेणं आवश्यक असतं. मात्र, अनेकांना रात्री झोप लागल्यानंतरही वारंवार जाग येण्याचा त्रास जाणवतो. अधूनमधून असं होणं सामान्य असू शकतं; पण नियमितपणे झोपमोड होत असेल, तर त्यामागे काही कारणं असू शकतात.

Frequent Waking Up at Night | pinterest

मानसिक ताण

दिवसभरातील कामाचा ताण, आर्थिक चिंता, कौटुंबिक समस्या किंवा एखाद्या गोष्टीची सतत काळजी यामुळे मेंदू सक्रिय राहतो. झोपण्याच्या वेळीही विचार सुरू असल्याने शांत झोप लागण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे रात्री वारंवार जाग येण्याची शक्यता असते.

Mental Stress | pinterest

झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा जास्त वापर केल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो. या उपकरणांमधून येणारा निळा प्रकाश शरीराच्या नैसर्गिक झोप-जागृती चक्रावर परिणाम करू शकतो. त्यामुळे झोप लागण्यास उशीर होणे किंवा झोपेची गुणवत्ता कमी होणे शक्य आहे.

Using Mobile Devices Before Bed | pinterest

रात्री चहा- कॉफी पिणे

चहा, कॉफी आणि काही एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन असतं. कॅफिनचा परिणाम अनेक तास शरीरात राहू शकतो. त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री कॅफिनयुक्त पेयांचं सेवन केल्यास झोप येण्यास त्रास होऊ शकतो आणि रात्री झोपमोड होऊ शकते.

Tea or Coffee at Night | pinterest

झोपण्यापूर्वी जड जेवण करणे

रात्री उशिरा जास्त प्रमाणात किंवा तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अपचन, ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. झोपताना हा त्रास वाढल्यास वारंवार जाग येऊ शकते. त्यामुळे झोपण्याच्या अगदी आधी जड जेवण टाळणं फायदेशीर ठरू शकतं.

Eating a heavy meal before bedtime | pinterest

वारंवार लघवीला जाणे

रात्री झोपेतून वारंवार लघवीसाठी उठावं लागत असेल, तर झोपेचं चक्र बिघडू शकतं. झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणं हे एक कारण असू शकतं. मात्र, मधुमेह, मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा इतर आरोग्य समस्यांमुळेही रात्री वारंवार लघवी होऊ शकते.

Frequent urination | pinterest

स्लीप ॲप्नियाचा त्रास

स्लीप ॲप्निया ही झोपेशी संबंधित समस्या आहे. यामध्ये झोपेत श्वास काही काळासाठी थांबतो किंवा श्वास घेण्याची प्रक्रिया वारंवार अडथळली जाते. त्यामुळे व्यक्तीला रात्री वारंवार जाग येऊ शकते. मोठ्याने घोरणे, झोपेत धाप लागणे आणि दिवसा सतत झोप येणे ही त्याची काही लक्षणे आहेत.

Sleep apnea | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : प्रेमाला वय नसतं, पण...हेल्दी रिलेशनशिपसाठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या वयात किती अंतर असावं?

Relationship Age Gap | AI PHOTO
येथे क्लिक करा...