उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने मोठा प्रशासकीय बदल करत 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये राज्य सरकारने प्रयागराज, बरेली, बस्ती आणि गोरखपूर या चार ठिकाणच्या बदल्या केल्या आहे. यासोबतच अनेक महत्वाच्या विभागांमध्ये विकास प्राधिकारणांमध्ये आणि विविध विभागांमध्येही नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने शासन स्तरावर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या आदेशानुसार नियुक्त सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या नव्या पदांचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या बदल्यांमध्ये डॉ. लोकेश एम. यांची प्रयागराजचे नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शंभू कुमार यांना बरेली, वैभव श्रीवास्तव यांना बस्ती आणि इंद्र विक्रम सिंह यांना गोरखपूरचे आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
सरकारने सौम्या अग्रवाल यांची उत्तर प्रदेशच्या नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. प्रकाश बिंदू यांना पीसीएफचे व्यवस्थापकीय संचालक करण्यात आले आहे, तर भूपेंद्र एस. चौधरी यांची प्रशासनिक सुधार विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. संदीप कुमार यांना पूर्वांचल विद्युत वितरण निगम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (MD) करण्यात आले आहे.
पुष्प राज सिंह यांची नोएडा येथे अपर मुख्य कार्यपालक अधिकारी (ACEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सतीश पाल यांना गृह विभागात विशेष सचिव म्हणून नेमण्यात आले असून डॉ. बलकार सिंह यांना UPSIDA चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनवण्यात आले आहे. तसेच रवींद्र यांना राज्य कृषी उत्पादन मंडी परिषदचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे, तर अनिल ढींगडा यांची उत्तर प्रदेश गृहनिर्माण आणि विकास परिषदेत गृहनिर्माण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.