Uttarakhand Robbery News Saam TV
देश विदेश

CCTV Footage : ज्वेलर्सवर भरदिवसा फिल्मी स्टाईल दरोडा; २० कोटींचे दागिने गायब; देहरादूनमधील चोरीची देशभर चर्चा VIDEO

Dehradun Jewelery Robbery : देहराडूनमधील राजपूर रोडवरील रिलायन्स ज्वेलर्सवर चोरट्यांनी धाड टाकून फिल्मी स्टाईलने लाखो रुपयांचा ऐवज लुटला.

प्रविण वाकचौरे

Uttarakhand Robbery News :

उत्तराखंडमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स लुटल्याची घटना समोर आली आली. चोरांनी काही मिनिटात कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल गायब केला. उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त डेहराडूनमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार असल्या सुरक्षा व्यवस्था कडक होती. तरीही चोरांनी ही धाडसी चोरी केली. यामुळे डेहराडून पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे.

डेहराडूनमधील राजपूर रोडवरील रिलायन्स ज्वेलर्सवर चोरट्यांनी धाड टाकून फिल्मी स्टाईलने लाखो रुपयांचा ऐवज लुटला. दिवाळीपूर्वी येणार्‍या धनत्रयोदशीला मोठ्या प्रमाणावर खरेदीची मागणी पाहता रिलायन्स ज्वेलर्सचे शोरूम सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरले होते. दरम्यान, गुरुवारी चोरट्यांनी भरदिवसा बंदुकीच्या धाकावर शोरूममध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि लुटमार केला. दरोडा टाकून चोरट्यांनी कोट्यवधींचे दागिने घेऊन पळ काढला. (Latest News)

कशी केली चोरी?

राजपूर रोडवर सेंट जोसेफ शाळेसमोर रिलायन्स ज्वेल्स नावाचे शोरूम आहे. या दुकानासमोर गजबजलेला रस्ता आहे. गुरुवारी सकाळी 10.20 वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी शोरूम उघडले. त्यानंतर काही वेळातच शोरूममध्ये चार चोरटे घुसले तर एक बाहेर उभा होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चोरट्यांनी शोरूममधील गार्डसह 11 कर्मचार्‍यांना आणि चार ग्राहकांना बंदुकीचा धाक दाखवून 20 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने लुटले. दरोडेखोर जवळपास 25 मिनिटे ज्वेलर्समध्ये होते. नंतर बाजारातील भरगर्दीतून दोन दुचाकींवरून त्यांनी पळ काढला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली, तोपर्यंत चोरटे पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेले होते. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, घटनेत वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. रिलायन्स ज्वेल्स शोरूमचे व्यवस्थापक सौरभ अग्रवाल यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

SCROLL FOR NEXT