Political News : दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण; वडेट्टीवार म्हणाले...

Sharad Pawar-Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटील आणि पवारांच्या बैठकीत रयत संस्थेबद्दल काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
Sharad PAwar- Dilip Walse patil
Sharad PAwar- Dilip Walse patilSaam TV
Published On

अक्षय बडवे

Pune News :

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर पक्ष शरद पवार गट आणि अजित पवार गट असा विभागला गेला आहे. मात्र दोन्ही गटातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची पुण्यात भेट झाली.

पुण्यात रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात बैठक सुरू आहे. ही बैठक राजकीय नसल्याचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अनेक जण त्यांच्या गटात गेले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad PAwar- Dilip Walse patil
Lalit Patil Case : ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील किती पैसे मोजायचा? पोलीस तपासात समोर आलेला आकडा ऐकून डोळे पांढरे होतील

अजित पवारांसोबत गेलेले काही नेते रयत संस्थेमध्ये अजूनही कार्यकारणीमध्ये सदस्य आणि पदाधिकारी आहेत. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे उत्तर विभाग अध्यक्षपदी होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचा राजीनामा समोर आला होता.  (Pune News)

त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील आणि पवारांच्या बैठकीत रयत संस्थेबद्दल काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. मात्र शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांमधील भेटीगाठींमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

Sharad PAwar- Dilip Walse patil
Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा, मुंबई हायकोर्टाकडून तो गुन्हा रद्द

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी शरद पवार-वळसे पाटील यांच्या भेटीवर म्हटलं की, आम्ही त्यामध्ये फार काही बोलणार नाही. पवार साहेब आणि अजित पवार गट बघून घेतील. वारंवार भेटीमुळे जो संशय निर्माण होत आहे, त्याचा खुलासा सुप्रिया सुळे यांनी याआधीच केला आहे. लोक दूर जातात, जवळ येतात, सोईनुसार वागतात राजकारणात हे अधिक बळावलं आहेत, त्याचं हे लक्षण आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com