Uttarakhand Nainital Road Accident:  Saamtv
देश विदेश

Nainital Road Accident: भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू

Nainital Road Accident चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

Uttarakhand Nainital Road Accident:

उत्तराखंडमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तराखंडच्या नैनीताल जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी (१७, नोव्हेंबर) सकाळी आठ वाजतच्या सुमारास नैनितालच्या ओखल कांडा गावाजवळ एक जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते तसेच चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघातात झालेल्या गाडीत किती लोक होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी पुढे पाठवले जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये तीन महिला, एक बालक आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. येथील रस्ता खराब असल्याने वाहन नियंत्रण सुटून खोल खड्ड्यात पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. सध्या घटनास्थळी लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Flood: नांदेडमध्ये पूराचं संकट कायम, कयाधू नदीचं पाणी शेतात शिरलं; बळीराजा चिंतेत

मुलींना वयाने मोठे पुरुष का आवडतात? कारणे जाणून घ्या

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

SCROLL FOR NEXT