Thane Water Cut : ठाणेकरांनाे! पाणी जपून वापरा, 2 डिसेंबरपर्यंत राहणार पाणीकपात; जाणून घ्या कारण

या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे.
nashik water supply
nashik water supplySaam TV

Thane News :

ठाणे शहरात झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात येत्या साेमवारपासून (ता. 20) दाेन डिसेंबरपर्यंत कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे. (Maharashtra News)

nashik water supply
Manoj Jarange Patil Sabha In Kolhapur: छत्रपतींना व्यासपीठावर स्थान द्यावे, मनाेज जरांगे पाटलांची इच्छा; जाणून घ्या काेल्हापुरातील वाहतुकीतील बदल

ठाणे महापालिकेस भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून 250 दक्ष लक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येताे. बृहन्मुंबई महानगर पालिका मार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम 20 नाेव्हेंबर ते दाेन डिसेंबर या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे.

परिणामी या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेस बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात लागू होणार आहे. त्यामुळे कोपरी, हाजुरी, गावदेवी, पांचपाखाडी, टेकडीबंगला, किसननगर 1-2, भटवाडी या भागात झोनिंगद्वारे 10 टक्के पाणी कपात लागू होणार आहे.

तसेच पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्याने 10 टक्के पाणी कमी उपलब्ध होणार असल्यामुळे ठाणे शहरातील दर पंधरा दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून 12 तास ऐवजी 24 तास करण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

nashik water supply
Manoj Jarange Patil Sabha In Satara: जरांगे-पाटलांच्या सभेला उदयनराजेंसह शिवेंद्रराजेंचा विराेध? मराठ्यांनी स्पष्टच सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com