Uttarakhand Accident Saam Tv
देश विदेश

Uttarakhand Accident: भाविकांनी भरलेला टेम्पो नदीत कोसळला, ८ जणांचा जागीच मृत्यू तर १५ जखमी

Passengers Truck Falls Into Alaknanda River: बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांनी भरलेला टेम्पो अलकनंदा नदीत कोसळला आहे. यामध्ये आठ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत टेम्पो ट्रॅव्हलर कोसळला. या अपघातात ८ भाविकांचा जागीच मृत्यू, तर १५ जण जखमी झाले आहेत. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये २३ भाविक असल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. तर सर्व भाविक बद्रीनाथ दर्शनासाठी जात होते. हे सर्व भाविक दिल्लीचे असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत.

उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये बद्रीनाथ महामार्गावर हा अपघात झाला (Uttarakhand Accident) आहे. टेम्पो नदीत पडल्यामुळे अनेक भाविक मृत्युमुखी पडले आहेत. हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. गाडीत सुमारे २३ प्रवासी असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. सीएम धामी यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केलं (Passengers Truck Falls Into Alaknanda River) आहे. त्यांनी X वर पोस्ट करून मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रार्थना केली आहे. मिळालेल्या माहितीनुसाल, गाडी खाली पडताच प्रवाशांमध्ये आरडाओरडा झाला. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला आहे. उत्तराखंड एसडीआरएफने सांगितले की, टीमने आतापर्यंत दोन जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेले आहे. टीम बचाव कार्यात गुंतली आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी X वर पोस्ट करून लिहिले (Accident News) की, 'रुद्रप्रयाग जिल्ह्यात भाविकांच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले (Road Accident) आहेत. मृतकांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT