Uttarakhand Car Accident Saam Tv
देश विदेश

Accident: देवदर्शनापूर्वीच भाविकांवर काळाचा घाला, अनियंत्रित कार नदीत कोसळली; चौघांचा मृत्यू

Uttarakhand Car Accident: उत्तराखंडमध्ये भीषण कार अपघात झाला. भाविकांची कार अनियंत्रित होत २०० फूट खोल दरीत कोसळून नदीत पडली. अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला.

Priya More
  • उत्तराखंडमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली

  • गंगोत्री महामार्गावर कार भागीरथी नदीत कोसळून चौघांचा मृत्यू

  • गंगोत्री धामला जाणाऱ्या गुजरातच्या भाविकांच्या कारला भीषण अपघात

उत्तराखंडमध्ये भाविकांवर काळाने घाला घातला. गंगोत्री धामला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार नदीत कोसळली. या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे तर दोघे जण बेपत्ता आहेत. गुरुवारी सकाळी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगाननीजवळ हा अपघात झाला. कार अनियंत्रित होऊन भागीरथी नदीत कोसळली. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगानीजवळ ७ जणांना घेऊन जाणारी कार भागीरथी नदीत कोसळली. अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट २०० मीटर खोल दरीत कोसळून नदीत पडली. अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले भाविक गुजरातचे रहिवासी आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सर्व प्रवासी गुजरातच्या साबरमती भागातील रहिवासी असून ते उत्तरकाशीहून गंगोत्री धामला दर्शनासाठी जात असताना ही अपघाताची घटना घडली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेतला जात आहे. अपघातामध्ये १ जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस, एसडीआरएफ आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. मदत आणि बचाव पथकाकडून बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेतला जात आहे. अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. पोलीस आणि एसडीआरएफची पथके नदीकाठावर आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम करत आहेत. अपघातामध्ये अशोकभाई पटेल, रुतिका अशोकभाई पटेल, घनश्यामभाई सरवालिया, सुरेंद्र सिंग यांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये वेदांत अशोकभाई पटेल गंभीर जखमी झाला आहे. तर सुधाबेन अशोकभाई पटेल आणि किरणबेन विशालभाई पटेल हे बेपत्ता आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: वसुबारसेलाच ग्राहकांना मोठा झटका! २४ तासांत सोनं ७ हजारांनी, तर चांदी १५ हजारांनी महागली

Maharashtra News Live Update: जळगावमध्ये 240 किलोंचा डुप्लिकेट खवा एफडीएने केला जप्त

Aadhaar Update : आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे झाले आता अत्यंत सोपे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Satej Patil: वोट चोरीनंतर आता सत्ता चोरीचा प्रयत्न; गोकुळच्या वादावरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Diwali 2026 : दिवाळीत फटाक्यांच्या धुरापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे? लालसरपणा, वेदना किंवा डोळ्यांतून पाणी येण्याकडे दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT