Shruti Vilas Kadam
सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी दोन्ही हातांचे तळवे पाहावेत. धार्मिक मान्यतेनुसार, तळहाताच्या वरच्या भागात माता लक्ष्मी, मध्यभागी माता सरस्वती आणि खालच्या भागात भगवान विष्णू यांचे वास्तव्य असते. त्यानंतर हात चेहऱ्यावरून फिरवावेत.
सकाळी अंथरुणातून उठण्यापूर्वी पृथ्वी मातेला हात लावून नमस्कार करावा. यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच सकाळी आपल्या कुलदैवताचे स्मरण करावे.
सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावावी. यामुळे आळस कमी होतो आणि दिवसभर उत्साही वाटते. तसेच सकाळची कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा. धार्मिक मान्यतेनुसार, मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
सकाळी अंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे. यामुळे मन प्रसन्न राहते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच थोडा वेळ योग किंवा ध्यान करावे.
सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घालावे आणि तिची पूजा करावी. हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते. तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी मान्यता आहे.
सकाळी उठल्यानंतर कोणाबद्दलही वाईट बोलू नये. तसेच कोणावरही रागावू नये. दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करावी आणि घरातील लोकांशी प्रेमाने बोलावे. यामुळे घरातील वातावरण आनंदी राहते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.