बदल्याची आग! जामिनावर बाहेर आला अन् अडकला ट्रॅपमध्ये, शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा रक्तरंजित थरार

पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर मंदार मारुती किवळे यांच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने गोळीबाराचा प्रयत्न करत कोयत्याने हल्ला केला. पिस्तूल मिसफायर झाल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर सपासप वार केले.
Pune Shivajinagar court attack today
Pune Shivajinagar court attack todayAI
Published On: 

Pune Shivajinagar court attack today : पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या सत्र न्यायालयाच्या जवळ आज चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तीव्र हत्यारांनी वार करत हल्ला केला. न्यायालयाच्या परिसरात झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मंदार मारुती किवळे (३५) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार न्यायालयासमोरील रस्त्यावर आज दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. दोन दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच जणांनी किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. पिस्तुलातून "मिस फायर" झाल्यामुळे त्याला गोळी लागली नाही मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या जवळील असलेल्या कोयत्याने मंदार किवळे वर सपासप वार केले. हे वार इतके तीक्ष्ण होते की किवळे याचे दोन्ही हात जवळपास शरीरापासून वेगळे झाले होते. हल्ला केल्यानंतर तात्काळ हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किवळे याला स्थानिकांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

एक वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा बदला

2025 मध्ये पुण्याच्या कात्रज भागात कात्रज भागात शुभम चव्हाण या तरुणाचा खून करण्यात आला होता. मालमत्तेच्या वादातून लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून शुभम चव्हाण याचा खून करण्यात आल्या प्रकरणी चार जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली होती. शुभम चव्हाण हा कात्रज भागातील संतोष नगर येथील रहिवासी होता तसेच त्याचे त्या भागात एक रेस्टॉरंट सुद्धा होते. घराशेजारील जमिनीवरुन शुभम चव्हाण आणि अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी लाकडी बांबु, स्टंपने शुभम चव्हाण याला मारहाण करुन त्याचा खुन केला. चव्हाण याचा खुन केल्यानंतर आरोपी पळून गेले होते.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे ते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथून आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.

Pune Shivajinagar court attack today
राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या माझ्यावर अन्याय....

टार्गेट ऑन स्पॉट! वेळ ठरली, दिसला की तोडला

शुभम चव्हाण याच्या हल्ल्याला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी चव्हाण यांचे सहकारी यांनी या आधीच प्लॅन बनवायला सुरुवात केली होती. शुभमच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्या मारेकऱ्यांना संपवण्याचा डाव आखला. या प्रकरणात आरोपी असलेला मंदार किवळे हा चार ते पाच दिवसांपूर्वी जामीनावर तुरुंगातून बाहेर आला होता. किवळे हा बाहेर आल्या असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर एक ते देऊन दिवसांपासून आरोपींनी "ट्रॅप" लावला होता. किवळे हा न्यायालीन कामकाजासाठी आज शिवाजीनगर भागातील जात असताना दबा धरलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले. संबंधित आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक सुद्धा तयार करण्यात आली आहेत.

Pune Shivajinagar court attack today
Accident : एसटीच्या चाकाखाली चिरडून एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.