सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या समोरच फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. थोड्यावेळापूर्वीच ही घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींकडून बंदूकीतून फायरिंग कऱण्यात आली, त्याशिवया कोयत्याने वारही करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.
कोर्टासमोरील ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून घटनास्थळाचा पंचनामा कऱण्याचे काम सुरू केले आहे. गोळीबार नेमका का झाला? याचा तपास पोलीस करत आहे. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसापूर्वी कोर्टाला उडून देण्याची धमकी देण्यात आली होता. त्यानंतर आज कोर्टाच्या बाहेरच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.