Accident : एसटीच्या चाकाखाली चिरडून एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील राजगुरुनगरजवळील राक्षेवाडी येथे भीषण अपघातात २२ वर्षीय एमपीएससी विद्यार्थिनी सोनाली कोळेकर हिचा मृत्यू झाला. एसटी बसला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने ती बसच्या चाकाखाली आली.
MPSC Student Accident Death
MPSC Student Accident DeathSaam TV
Published On: 

रोहिदास गाडगे, पुणे प्रतिनिधी

MPSC Student Accident Death : पुण्यातील राजगुरुनगर शहराजवळील राक्षेवाडी परिसरात एका भीषण रस्ते अपघातात २२ वर्षीय एमपीएससी (MPSC) विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोनाली कोळेकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नेमकी घटना काय?

राक्षेवाडीतील गणेश मंदिरासमोरून एक दुचाकी जात होती. या दुचाकीवर सोनाली कोळेकर पाठीमागे बसली होती. अरुंद रस्ता आणि वाहनांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जाण्यासाठी दुचाकीस्वाराने एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले. दुर्दैवाने, मागे बसलेली सोनाली थेट एसटी बसच्या चाकाखाली चिरडली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

अनधिकृत पार्किंगमुळे अपघात वाढल्याचा आरोप

काळजाचा ठोका चुकवणारा हा संपूर्ण प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राक्षेवाडी परिसरातील अरुंद रस्ता, रस्त्यालगत होणारी अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हीच वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, प्रशासनाने तातडीने हा रस्ता मोकळा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

MPSC Student Accident Death
राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या माझ्यावर अन्याय....

राक्षेवाडीतील गणेश मंदिरासमोर असलेला अरुंद रस्ता आणि वाहनांच्या गर्दीतून वाट काढत एसटी बसला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वाराचा ताबा सुटला. दुचाकी रस्त्यावर घसरल्याने पाठीमागे बसलेली सोनाली कोळेकर थेट एसटीच्या चाकाखाली आली आणि जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झालाय.

MPSC Student Accident Death
Diabetes : डायबिटीज असतानाही १०० वर्षे जगता येतं! फक्त 'ABCD' मंत्र पाळा; काय आहे हा फॉर्म्युला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.