Vrindavan Gurukul Tragedy Four Students Die Due To Toxic Gas Saam tv
देश विदेश

Shocking : भयंकर! पाण्याची टाकी साफ करायला उतरले परत बाहेर आलेच नाहीत; ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Uttar Pradesh Vrindavan Tragedy News : वृंदावनच्या महर्षी पाणिनी संस्कृत गुरुकुलममध्ये पाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या चार विद्यार्थ्यांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला. एक विद्यार्थी गंभीर असून घटनेचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • वृंदावनच्या महर्षी पाणिनी संस्कृत गुरुकुलममध्ये भीषण दुर्घटना

  • पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना विषारी वायूमुळे ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

  • एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर

  • घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत

उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील चैतन्य विहार परिसरातील महर्षी पाणिनी संस्कृत गुरुकुलममध्ये मंगळवारी रात्री एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यासाठी टाकीत उतरलेल्या चार विद्यार्थ्यांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला. तर आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गुरुकुल परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुकुल परिसरातील सुमारे १२ फूट खोल सबमर्सिबल पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे टाकीची साफसफाई करण्यासाठी एक विद्यार्थी आत उतरला. मात्र, टाकीत असलेल्या विषारी वायूमुळे तो काही क्षणांतच बेशुद्ध झाला. बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांनी त्याला आवाज दिला, मात्र कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी एकामागोमाग चार विद्यार्थी टाकीत उतरले. मात्र, विषारी वायूमुळे तेही टाकीतच बेशुद्ध पडले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना टाकीतून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर चार विद्यार्थ्यांना मृत घोषित केले. मृत विद्यार्थ्यांमध्ये मध्य प्रदेशातील जबलपूर येथील २० वर्षीय मनु कटारे, १८ वर्षीय देवांश, मेरठ येथील १७ वर्षीय विशु आणि प्रयागराज येथील १७ वर्षीय आर्यन पांडे यांचा समावेश आहे. तर १८ वर्षीय रुद्राक्षची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह, एसएसपी श्लोक कुमार आणि नगर आयुक्त यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुकुलमध्ये राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांकडून आणि प्रत्यक्षदर्शींकडून घटनेची माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार, विषारी वायूमुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. पोस्टमार्टमनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही या घटनेची दखल घेतली असून पीडित कुटुंबीयांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये आणखी एक दुष्काळाचा बळी; नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर 'या' दिवशी ३,००० येणार? महत्त्वाचं कारण आले समोर

Ajit Agarkar: अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला; नवा सिलेक्टर कोण होणार? BCCI ने मागवले अर्ज

Lemon Water : सकाळी रिकाम्यापोटी 'या' बिया लिंबू पाण्यात मिसळून प्या; वजन, शुगर अन् बीपी कायम राहील कंट्रोलमध्ये

Morning Tea Side Effects: सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ॲसिडीटी होते का? आरोग्यावर होणारे 5 परिणाम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT