UP Sambhal Surveillance Saam Tv
देश विदेश

UP Sambhal: संभलमध्ये RRF आणि PAC जवानांचा बंदोबस्त, ड्रोनची देखरेख; होळी आणि 'जुमा'मुळे प्रशासन सतर्क

UP Sambhal Surveillance: उत्तर प्रदेशमध्ये होळी आणि शुक्रवारच्या नमाज संदर्भात विशेष सतर्कता ठेवण्यात आलीय. आज होलिका दहननंतरचा धुलिवंदनचा सण साजरा केला जात आहे.

Bharat Jadhav

गेल्या अनेक महिन्यांपासून संभल चर्चेत आहे. होळी आणि शुक्रवार एकाच दिवशी पडत असल्याने संभलमध्ये पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. दुपारी अडीचच्या आधी होळी खेळावी, त्यानंतर शुक्रवारची नमाज होईल, असे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितलंय. संभलमधील मशिदींभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आलेत. तर होळी खेळण्यासाठी उत्तर प्रदेशातील मथुरा आणि वृंदावन येथे मोठ्या संख्येने भाविक जमा होताहेत.

वृंदावनच्या प्रेममंदिरात मोठी गर्दी असून लोक होळी खेळत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये होळी आणि शुक्रवारच्या नमाज संदर्भात विशेष सतर्कता ठेवण्यात आलीय. संभल जिल्ह्यात होळी साजरी आणि शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. RRF आणि PAC कंपन्या तैनात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा दलांनी परिसरात फ्लॅग मार्च काढलाय.

आज लोकांनी होळी साजरी केली. एकमेकांना गुलाल लावून धुलिवंदन खेळली. संभलचे एसपी केके बिश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीचच्या आधी होळी साजरी केली जाईल. त्यानंतर दुपारी अडीचनंतर शुक्रवारची नमाज अदा केली जाईल. शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

मला आशा आहे की, ही होळी सर्वांना आनंद देईल, असं पोलीस अधीक्षक केके बिश्नोई म्हणालेत. पोलिसांकडून पेट्रोलिंग केली जात आहे. ड्रोनच्या मदतीने देखरेख केली जात आहे. गस्त घातली जात आहे, त्यामुळे काहीच समस्या नाहीये. नागरिक होळी साजरा केला जात आहे. शुक्रवारीची नमाज नेहमी सारखी सारखी अदा केली जाईल. सनातन धर्म जुन्या परंपरांचं पालन करत सद्भभावनेसह होळी धुलिवंदन साजरे करावं, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय. कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नये, सन्मान करत होळी आणि धुलिवंदन साजरे करावे असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT