24 Prisoners Found Hiv Positive Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! एका महिलेसह २४ कैद्यांना HIV ने गाठलं; कारागृह प्रशासन हादरलं

सर्व कैद्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सहारनपूर : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सहारनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कारागृहात एका महिलेसह एकूण २४ कैदी (Prisoners) एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. २४ कैद्यांना एचआयव्हीची लागण झाल्याची पुष्टी होताच कारागृहात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या सर्व कैद्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Uttar Pradesh Crime News)

कारागृह अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृहात 2200 हून अधिक कैदी आहेत. काही दिवसांपूर्वी क्षयरोगाची लक्षणे दिसणाऱ्या कैद्यांमध्ये तपासणीसाठी कॅम्प लावण्यात आला होता. त्यावेळी त्यांची एड्स चाचणीही झाली. या चाचणीचा बुधवारी अहवाल प्राप्त झाला. या अहवालात 24 कैद्यांना एचआयव्हीची लागण झाल्याची पुष्टी झाली. यापैकी एक महिला आणि उर्वरित पुरुष कैदी आहेत.

या घटनेबाबत कारागृह अधीक्षकांनी सांगितले की, एचआयव्हीची लागण झालेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांचीही तपासणी केली जाईल. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्या कैद्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले, ते सर्व नशेचे व्यसनी आहेत. यातील बहुतांश कैदी गंगोह, बेहत, देवबंद आणि मिर्झापूर येथील आहेत. पाच ते सात महिन्यांपूर्वी या कैद्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. (Uttar Pradesh News)

दरम्यान, या कैद्यांना एचआयव्हीची लागण नेमकी कधी? आणि केव्हा झाली?. याची माहिती जमा करण्याचे काम आरोग्य प्रशासन करत आहेत. आरोग्य विभागाने आता या कैद्यांच्या कुटुंबीयांचे नमुने घेण्याची तयारी केली आहे. या कैद्यांवर उपचार करण्यासाठी स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी आणि अँटी रेट्रो व्हायल थेरपी सेंटर (एआरटी सेंटर) यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मीच बाळासाहेब ठाकरे" संदेश देताय का? – राऊतांचा शिंदेंना सवाल

Chennai Shocked : थर्मल पॉवर प्लांटमध्ये मचान कोसळला, ९ मजुरांचा जागीच मृत्यू, चेन्नईत घडली दुर्घटना

Shocking: 'सर्वांची आई मरते, नाटक करू नको कामावर ये', सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर बॉस भडकला, ई-मेलचे फोटो व्हायरल

तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले; गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली|VIDEO

Maharashtra Live News Update:पुणे नाशिक महामार्गावरील भिमा नदीच्या पुलावर भिषण अपघात

SCROLL FOR NEXT