Corona Booster Dose Free: मोठी घोषणा! बुस्टर डोस मोफत मिळणार; कुणाला आणि कधीपासून? वाचा

कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस आता मोफत दिला जाणार आहे. केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
Free Covid booster doses coronavirus vaccination update
Free Covid booster doses coronavirus vaccination updateSAAM TV
Published On

नवी दिल्ली: देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना आता कोरोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा म्हणजेच बुस्टर डोस मोफत मिळणार आहे. १५ जुलैपासून मोफत बुस्टर डोस मिळणार आहे. पुढील ७५ दिवसांसाठी ही मोहीम असणार आहे. (Corona Booster Dose Free)

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, भारत स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकारने हा निर्णय घेतला आहे. १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरील अधिक वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस (Corona Booster Dose) मोफत दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

Free Covid booster doses coronavirus vaccination update
COVID 19 Vaccine Booster: कोरोना लसीच्या बुस्टर डोसबाबत सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या सविस्तर

अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला आहे. बुस्टर डोसची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. हे सरकार शास्त्रीयदृष्ट्या निर्णय घेते. स्वतःहून कोणताही निर्णय घेतला जात नाही. १८ वर्षांवरील जे नागरिक सरकारी रुग्णालयांमध्ये बुस्टर डोस (Booster Dose) घेतील, त्यांना ते मोफत दिले जाणार आहे.

देशातील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. बुस्टर डोस सर्व सरकारी केंद्रांवर उपलब्ध असणार आहे, अशी माहितीही अनुराग ठाकूर यांनी दिली.

Free Covid booster doses coronavirus vaccination update
सावधान! पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका; देशातील 24 तासांतील आकडेवारी धडकी भरवणारी

यापूर्वी सरकारने सांगितले होते की, कोरोना लसीचा बुस्टर डोस ६० वर्षांहून अधिक वयाचे नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना मोफत देण्यात येईल. मात्र, आता या घोषणेनंतर बुस्टर डोस १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे. आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत एकूण १९९.२ कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशात आता दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३.६८ टक्के आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा ४.२६ टक्के इतका आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com