Uttar Pradesh News Tragic Double Death Saam
देश विदेश

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील सुंगिरा गावात दोन भावांचा एकाच घरातून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचे वादळ कोसळले आहे. ही धक्कादायक घटना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल.

Bhagyashree Kamble

  • महोबाच्या सुंगिरा गावात दोन्ही भावांचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

  • मोठा भाव कल्लू कुशवाहा आजारी असून उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • छोट्या भावाला मोठ्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून मानसिक धक्का बसला, त्याचा मृत्यू झाला.

  • दोघांचे मृतदेह एकत्र बाहेर काढले गेले आणि गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला.

उत्तर प्रदेशातील महोबा येथे २ भावांमधील अतुट जिव्हाळा पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. आधी मोठ्या भावाचा मृत्यू झाला. नंतर छोट्या भावाला मानसिक धक्का बसला. या दुखा:त छोट्या भावानंही प्राण सोडले. एकाच घरातून दोन्ही भावांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, गावात शोककळा पसरली आहे.

ही धक्कादायक घटना सुंगिरा गावातून समोर आली आहे. कल्लू कुशवाहा असे मोठ्या भावाचे नाव आहे. प्यारे लाल कुशवाहा असे छोट्या भावाचे नाव आहे. कल्लू कुशवाहा बराच काळ आजारी होते. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी कल्लूचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला.

छोट्या भावाला मोठ्या भावाच्या मृत्यूची बातमी कळताच मानसिक धक्का बसला. या धक्क्यामुळे छोट्या भावाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये गोंधळ उडाला. कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या भावावर छोट्या भावाचा खूप जीव होता.

कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती करून चालत होता. दोन्ही भावांच्या मृत्यूनंतर लोकांनी सांगितले की, भावांमध्ये असे प्रेम क्वचितच दिसून येत होते. दोघांचे मृतदेह एकत्र बाहेर काढण्यात आले. दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूची बातमी कळताच गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पद मागितलं तर रिपोर्ट कार्ड काढेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नगरसेवकांना इशारा

Maharashtra Drought: राज्यात आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, यादीत तुमचा तालुका आहे का? वाचा

आयटीआयमध्ये मिळणार पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार

Jaw reconstruction surgery: जबड्याच्या कॅन्सरची गाठ काढल्यानंतर चेहरा विद्रूप होण्याची भीती सोडा! आधुनिक शस्त्रक्रियेमुळे पुन्हा मिळेल चेहऱ्याचा मूळ आकार

Nail Cancer: नखांच्या कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं कोणती? वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT