Metro : राज्यात ३ ठिकाणी नव्याने सुरु होणार मेट्रो, कुठे आणि कधी?

Big Boost to Metro Network: ठाणे, पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी कर्जाला मंत्रिमंडळाची मान्यता. पुणे मेट्रो मार्गिका २ व ४ तसेच नागपूर मेट्रो टप्पा-२ साठी आर्थिक मंजुरी.
Big Boost to Metro Network
Big Boost to Metro NetworkSaamTV
Published On
Summary
  • ठाणे, पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी कर्जाला मंत्रिमंडळाची मान्यता.

  • पुणे मेट्रो मार्गिका २ व ४ तसेच नागपूर मेट्रो टप्पा-२ साठी आर्थिक मंजुरी.

  • द्वीपक्षीय व बहुपक्षीय संस्थांकडून सुलभ व्याजदरावर कर्ज मिळणार.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतला महत्त्वाचा निर्णय.

राज्यातील महत्वाच्या मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे वर्तुळावर मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका - २, मार्गिक - ४ आणि नागपूर मेट्रोच्या टप्पा - २ या प्रकल्पांसाठी आवश्यक कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मान्यता मिळालेल्या प्रमुख समावेश:

ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प.

पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रो कॉरिडॉर.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो कॉरिडॉर.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो कॉरिडॉर.

वनाज ते रामवाजी (मार्गिका क्रमांक २) चे विस्तारीकरण, वनाज - चांदणी चौक आणि रामवाडी - वाघोली (विठ्ठलवाडी).

पुणे मेट्रो मार्गिका-४, खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी.

नळ स्टॉप वारजे - माणिकबाग उपमार्गिका.

Big Boost to Metro Network
अडवल्याचा राग डोक्यात गेला, भरचौकात तरुणांचा राडा; शिवीगाळ करत पोलिसावर जीवघेणा हल्ला

बैठकीतील महत्वाचे निर्णय:

  • या सर्व मेट्रो प्रकल्पांना या पूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळाली होती.

  • प्रकल्पांसाठी आवश्यक कर्जाची जबाबदारी स्वीकारण्यास तसेच त्यासाठी आवश्यक करार करण्यास मान्यता देण्यात आली.

  • मंजूर केलेल्या मर्यादेत द्वीपक्षीय, बहुपक्षीय वित्तीय संस्था किंवा इतर संस्थांमार्फत सुलभ व्याज दराचे कर्ज उपलब्ध करून घेता येईल.

  • या कर्जाची मुद्दल, व्याज आणि शुल्काची परतफेड संबंधित प्रकल्पांनी करावी लागेल.

  • आवश्यकता भासल्यास शासनाकडून हमी देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

Big Boost to Metro Network
नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहाथ पकडलं, बायकोचा रौद्रावतार पाहून तरूणाची खाडीत उडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com