
बिहारच्या पठ्ठ्यानं ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये कुलर लावून थंड हवेचा आनंद घेतला
हा हटके जुगाड पाहून प्रवासी आणि नेटकरी थक्क झाले
व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला
रेल्वे प्रशासन कारवाई करणार की दुर्लक्ष करणार याची चर्चा सुरू
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. हटके कटेंटमुळे बरेच जण रातोरात स्टार झाले आहेत. अशातच बिहारच्या पठ्ठ्याच्या एका कृतीमुळे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. बिहारच्या पठ्ठ्यानं ट्रेनमध्ये असं काही केलंय की, अनेकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक प्रवासी त्याच्या सीटवर आरामात झोपलेला आहे. त्याच्या शेजारी एक मोठा कुलर आहे. तसेच तो कुलर चालू आहे. थंडी हवा घेत तो तरूण आरामात झोपलेला आहे. त्यानं शक्कल लढवत ट्रेनला मिनी एसी कोच बनवले आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक बिहारचा तरूण ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये त्याच्या सीटवर झोपला आहे. पण यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्याच्या शेजारी कुलर दिसत आहे. कुलर चालू असून, तो आरामात थंड हवा घेत झोपला आहे. त्यानं शक्कल लढवत केलेल्या जुगाडमुळे त्यानं ट्रेनला मिनी एसी कोच बनवले आहे.
यात दिसून येतंय की, कुलरला वायरने जोडण्यात आले आहे. बिहारच्या तरूणाला तर थंड हवा मिळत आहेच, सोबत इतर प्रवाशांनाही कुलरच्या थंड हवेचा आनंद घेता येत आहे. हे एका सामान्य रेल्वे कोचचे दृश्य आहेत. पण कुलरकडे पाहून असं वाटतंय की, जणू तो एखाद्याचा रूम आहे.
या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, भारतात जुगाडची कमतरता नाही. परिस्थिती कितीही कठीण किंवा हालाखीची असली तरी, भारतीय लोक स्वत:साठी जुगाड करण्यासाठी तज्ज्ञ आहेत. आता रेल्वे या प्रकरणावर काय कारवाई करेल, की विनोद म्हणून दुर्लक्ष करेल, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.