Meerut Building Collapse Saam Tv
देश विदेश

Meerut Building Collapse : तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा VIDEO समोर

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये शनिवारी ३ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण बचावले.

Priya More

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये तीन मजली इमारत कोसळून एकाच कुटुंबातील ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी अचानक ही तीन मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाळी एकाच कुटुंबातील १५ जण अडकले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एसडीआरएफ, एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. या घटनेमध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृ्त्यू झाला. यामध्ये दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. गेल्या १५ तासांपासून घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मेरठच्या झाकीर कॉलनीमध्ये असलेली तीन मजली इमारत कोसळली. मुसळधार पावसामुळे संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ३५ वर्षे जुनी इमारत कोसळली. यामध्ये १५ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. यापैकी १४ जणांना बाहेर काढण्यात आले. यामधील ९ जणांचा मृत्यू झाला. ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकला आहे. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एडीजी डीके ठाकूर यांनी सांगितले की, ही घटना सायंकाळी ५.१५ च्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली दबून दीड वर्षाच्या मुलीसह ९ जणांचा मृत्यू झाला. हे घर एका विधवा महिलेचे होते. जी आपल्या मुलाच्या कुटुंबासह इथे राहत होती. तीन मजली घराच्या तळमजल्यावर एक डेअरी चालवली जात होती. त्यामुळे अनेक म्हशीही ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. ही इमारत खूपच जुनी होती आणि त्याची दुरावस्था झाली होती.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, घर कोसळताच सिलेंडर फुटल्याचा मोठा आवाज आला. ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आम्ही धावलो. तत्काळ पोलिसांनाही कळवले. अरुंद गल्लीमुळे जेसीबी गल्लीत जाऊ शकत नव्हता. अग्निशमन दलाच्या पथकाने हातानेच बचावकार्य सुरू केले. दोन तासांनंतर एनडीआरएफ-एसडीआरएफची टीम मशीन्स घेऊन आल्या. यानंतर वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले. ५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर ९ जणांचा मृत्यू झाला. एक जण अजूनही ढिगाऱ्याखाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT