BLO End Life In Uttar Pradesh Saam Tv
देश विदेश

Shocking: 'सर टार्गेट पूर्ण करू शकलो नाही...', बीएलओची गळफास घेत आत्महत्या, ३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण

BLO End Life In Uttar Pradesh: एसआयआरचे टार्गेट पूर्ण करू न शकल्यामुळे चिंतेत आलेल्या बीएलओने आत्महत्या केली. राहत्या घरात गळफास घेत त्यांनी आयुष्य संपवले. त्यांनी आत्महत्येआधी ३ पानांची सुनाईड नोट लिहिली होती.

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशमध्ये बीएलओने केली आत्महत्या

  • बीएलओ सर्वेश सिंह यांनी SIR टार्गेट पूर्ण करून न शकल्याने उचलले टोकाचे पाऊल

  • तणावातून त्यांनी राहत्या घरी घेतला गळफास

  • घटनेच्या ठिकाणी ३ पानांची सुसाईड नोट सापडली

उत्तर प्रदेशमध्ये बीएलओने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुरादाबाद येथील भोजपूर भागातील बहेरी ब्राह्मणन गावात ही घटना घडली. सर्वेश सिंह असं आत्महत्या केलेल्या बीएलओ अधिकाऱ्याने नाव होते. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू (SIR) टार्गेट पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे तणावात येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी रात्री राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आयुष्य संपवले.

रविवारी पहाटे ४ वाजता त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह पाहिला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. सर्वेश सिंह यांच्या कुटुंबातील सदस्यांना घरामध्ये एक सुसाईड नोट सापडली. त्यांनी लिहिले होते की, ते त्यांचे एसआयआर लक्ष्य पूर्ण करू शकले नाहीत. ते दिवसरात्र प्रचंड तणावाखाली होते. ज्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली.

४६ वर्षीय सर्वेश सिंग हे भगतपूर तांडा ब्लॉकमधील जाहिदपूर सिकमपूर गावातील कंपोझिट शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्त होते. त्यांना एसआयआरच्या बूथ क्रमांक ४०६ साठी बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना एक पत्रही लिहिले होते की, त्यांना ७ ऑक्टोबर रोजी बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. एसआयआरचे टार्गेट पूर्ण करता आले नसल्यामुळे ते तणावात होते. याच तणावातून त्यांनी ३ पानांची सुसाईट नोट लिहित आत्महत्या केली. शनिवारी रात्री ते आपल्या खोलीत झोपायला गेले होते. रविवारी पहाटे कुटुंबीयांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना पाहिले. त्यांना तात्काळ खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले पण उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

बीएलओच्या आत्महत्येची माहिती मिळताच भोजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. तपासात तीन पानांची सुसाईड नोट सापडली. दोन पानांवर त्यांनी मूलभूत शिक्षण विभाग आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र लिहिले आणि एसआयआरचे टार्गेट पूर्ण न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. शिक्षक आणि त्यांच्या नातेवाईकांनी आक्रमक होत रास्तारोको केला होता. एसआयआरसाठी दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 31 जानेवारीपर्यत निवडणूक आयोगाला निवडणूका संपवाव्या लागणार- अजित पवार

Shahajibapu Patil: शहाजीबापू पाटील राजकारण सोडण्याच्या तयारीत, म्हणाले वरिष्ठ नेत्यांशी बोलून....

लग्नात चिमुकलीवर नराधमाची घाणेरडी नजर; उसाच्या शेतात नेत अत्याचाराचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं

Local body Election : निवडणुकीला हिंसक वळण; अजितदादांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर दगडफेक, भाजपवर गंभीर आरोप

Bharti Singh Photos : दुसऱ्यांदा आई होणार कॉमेडी क्वीन, बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोशूट

SCROLL FOR NEXT