Uttar Pradesh News Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh News: नवरा कामानिमित्त शहराबाहेर, बायको पडली दिराच्या प्रेमात; अंधाराचा फायदा उचलला अन्...

नवरा कामानिमित्त शहराबाहेर, बायको पडली दिराच्या प्रेमात; अंधाराचा फायदा उचलला अन्...

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशात एक विचित्र घटना घडली आहे. येथे पती कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला असता पत्नीला एकटेपणा जाणवू लागला. याच दरम्यान एकटेपणा दूर करण्यासाठी ती आपल्या मोठ्या दिरासोबत गप्पा गोष्टी मारत दिवसास घालवू लागली. गप्पा गोष्टी करत दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले, हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही.

दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाले की विसरून गेले की, या दोघांनाही तीन-तीन मुलं आहे. यातच विवाहित महिलेने अंधाराचा फायदा घेत असे काही केले की, याची चर्चा संपूर्ण गावात होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील रामपूर येथील आहे. येथे गावातील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेचे तिच्याच दिराशी प्रेमसंबंध जुळलं. या महिलेला तीन मुले आहेत आणि तिच्या दिरालाही तीन मुले आहेत. दोघांमधील प्रेम इतकं वाढलं की महिलेच्या नवऱ्यालाही याचा सुगावा लागला नाही. या महिलेला तिच्या दिरासोबत राहायचे होते. महिलेने आपल्या दिरासोबत मिळून पळून जाण्याचा बेत आखला आणि एका रात्री दोघेही पळून गेले. (Latest Marathi News)

यानंतर महिलेच्या पतीने आणि नातेवाईकांनी दोघांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुठेच सापडले नाहीत. शनिवारी दुपारी महिला आणि तिचा दीर गावातील पोलीस ठाण्यात आले. याची माहिती मिळताच महिलेचा पती, मुले व नातेवाईकही पोलीस ठाण्यात आले. जिथे महिलेच्या पतीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण दिराच्या प्रेमात वेडी झालेली महिला आपल्या तीन मुलांनाही सोडायला तयार होती.

दुसरीकडे दिरालही या महिलेसोबत राहायचं होतं. पोलीस ठाण्यात या दोघांचीही समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. मात्र दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पोलिसांनीही महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेने त्यांचंही ऐकलं नाही. हे दोघेही ऐकत नसल्याने पोलिसांनी महिलेला दिरासोबत जाऊ दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OG Box Office: पवन कल्याण आणि इमरान हाश्मीच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम; दोन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये एंट्री

Maharashtra Live News Update: जळगाव जिल्ह्यात विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात

सरसकट कर्जमाफी द्या, पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करा, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी|VIDEO

Delhi Tourism : दिल्लीतील 'हे' ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांचे आकर्षण, सुट्टीत येथे ट्रिप प्लान कराच

Cobra Snake Video: पैसे अन् दागिने ठेवलेल्या तिजोरीत घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून थरकाप उडेल

SCROLL FOR NEXT