Ghaziabad Building Fire Saam Tv
देश विदेश

Ghaziabad Fire: उत्तर प्रदेशमध्ये तीन मजली इमारतीला भीषण आग, २ चिमुकल्यांसह ५ जणांचा मृत्यू

Ghaziabad Building Fire: गाझियाबादच्या लोनी येथील बेहता हाजीपूर भागात इमारतीला आग लागल्याची ही घटना घडली. या आगीमध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) इमारतीला लागलेल्या आगीमध्ये होरपळून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. गाझियाबादच्या लोनी येथील बेहता हाजीपूर भागात ही घटना घडली. एका तीन मजली इमारतीला अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला, ७ वर्षांची मुलगी आणि सात महिन्यांच्या मुलासह ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

गाझियाबादचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिनेश कुमार यांनी सांगितले की, आम्हाला रात्री उशिरा बेहता हाजीपूर येथून एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. या घरामध्ये अनेक जण अडकले असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीला जखमी अवस्थेत एका महिलेला आणि लहान मुलाला बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर आगीमुळे दुसऱ्याम मजल्यावर अडकलेल्या ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे.

स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सांगितले की, घरात ठेवलेल्या थर्मोकोलमुळे आग वेगाने पसरली. तर पोलिस अधिकारी सध्या मृतांची ओळख पटवण्याचा आणि आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर डीसीपी विवेक चंद्र यादव यांनी नंतर सांगितले की, दोन जखमींची ओळख पटली आहे. २६ वर्षीय उस्मा आणि एक अल्पवयीन मुलगा जखमी झाले आहेत.

या आगीमध्ये नजरा (२६ वर्षे) आणि तिची मुलगी इक्रा (७ वर्षे), शैफुल रहमान (३५ वर्षे), मोहम्मद फैज (सात महिने) आणि परवीन (२८ वर्षे) यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची अग्निशमन दलाला सखोल तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

Kitchen Hacks : घरात पंख्यावर खूपच धुळ बसली? मग 'या' सिंपल ट्रिक्सने करा स्वच्छ

White Sesame Seeds Benefits: थंडीत रोज सकाळी एक चमचा सफेद तीळ खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

SCROLL FOR NEXT