Kuwait Fire News: कोणी ड्रायव्हर तर कोणी इंजिनिअर; पोटाची खळगी भरायला गेलेल्यांवर काळाचा घाला, कुवेतमधील आगीत ४९ जणांचा मृत्यू

Kuwait Fire News Update: कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत जवळपास ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत मृत्यू झालेल्यांपैकी ४२ लोक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे.
Kuwait Fire News
Kuwait Fire NewsSaam Tv

कुवेतमध्ये कामगारांच्या इमारतीला लागलेल्या आगीत जवळपास ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.यापैकी ४२ जण भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ५० हून अधिक जण जखमी झाली आहे. या इमारतीत जवळपास १९५ कामगार राहत होते. १२ जून रोजी पहाटे हा अपघात घडला. या अपघातानंतर पंतप्रधान मोदी यांनी घटनेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्यानंतर आता देशाचे केंद्रिया परराष्ट्र राज्यमंत्री किर्ती वर्धन कुवेतला रवाना झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत तमिळनाडू, केरळमधील जास्तीत जास्त रहिवासी राहत होते. या आगीत मृत्यू झालेल्यांपैकी कोणी इंजिनिअर होता तर कोणी ड्रायव्हर होता. आपल्या मुलाचा, पतीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कोल्लम जिल्ह्यात राहणाऱ्या शमीरचादेखील या आगीत मृत्यू झाला आहे. शमीर गेल्या पाच वर्षांपासून कुवेतमध्ये ड्रायव्हरमधून काम करत होता. त्याचा या घटनेत दुर्घनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर केरळमधील स्टेफिन आब्राहम साबूचा (वय २९) या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. स्टेफिन हा कुवेतमध्ये इंजिनिअर म्हणून काम करत होता. या घटनेमुळे स्टेफिनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याशिवाय केरळमधील आणखी दोन जणांचे या आगीत मृत्यू झाले आहेत. केलू पोनमलेरीचा या आगीत मृत्यू झाला आहे. तो एनबीटीसी ग्रुपमध्ये प्रोडक्शन इंजिनिअर म्हणून काम करत होता. याच दुर्घटनेत ३४ वर्षीय रणजीतचादेखील मृत्यू झाला आहे. तो गेल्या दहा वर्षांपासून कुवेतमध्ये काम करत होता.

कुवेतला झालेल्या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र राज्य मंत्री किर्ती वर्धन कुवेतला रवाना झाले आहेत. काल रात्री परराष्ट्र विभागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीनंतरच मोदी यांनी किर्ती वर्धन यांना कुवेतला जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर किर्ती वर्धन आता कुवेतला रवाना झाले आहेत.

Kuwait Fire News
Boat Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बोट नदीत बुडाली;८० जणांचा मृत्यू, शोधकार्य सुरु

कुवेतला रवाना होण्याआधी किर्ती वर्धन यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. किर्ती वर्धन यांनी सांगितने की, कुवेतला पोहचल्यावर तेथील परिस्थिती स्पष्ट होईल. मृतांपैकी काहींचे मृतदेह खूप जास्त जळाले आहेत. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहेत. परंतु जशी मृतदेहांची ओळख पटेल तशी माहिती कुटुंबियांना दिली जाईल. त्यांचे मृतदेह हवाई दलाच्या विमानाने भारतात परत आणले जातील. मृतांची संख्या जवळपास ४८-४९ आहे, त्यातील ४२ भारतीय आहेत.

Kuwait Fire News
PM Modi Italy Visit: PM मोदींचा पहिला विदेश दौरा! आज इटलीला रवाना होणार, जी-७ परिषदेला उपस्थिती; पंतप्रधान जॉर्जिया मेलोडोया यांची भेट घेणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com