Arunachal Pradesh New CM: अरुणाचल प्रदेशमध्ये पेमा खांडूंची हॅट्रिक! तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

Arunachal Pradesh CM oath ceremony: अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभांच्या जागांसाठी लोकसभा निवडणुकांसोबतच १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४६ जागांवर विजय मिळवत सत्ता खेचून आणली.
Arunachal Pradesh New CM: अरुणाचल प्रदेशमध्ये पेमा खांडूंची हॅट्रिक! तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान
Arunachal Pradesh CM oath ceremony:Saamtv
Published On

अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच पेमा खांडू यांच्यासोबत  चौना मीन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य ११ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल के टी परनाइक यांनी मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. बुधवारी झालेल्या बैठकीत पेमा खांडू यांची भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरीक्षक - रविशंकर प्रसाद आणि तरुण चुगही सहभागी झाले होते.

त्यानंतर आज नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मुक्तो विधानसभा मतदारसंघाचे आमदार खांडू यांना राज्यपाल केटी पारनाईक यांनी शपथ दिली. खांडू यांच्यासह अन्य 11 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

Arunachal Pradesh New CM: अरुणाचल प्रदेशमध्ये पेमा खांडूंची हॅट्रिक! तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान
Maharashtra Politics: लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी? आज अजित पवार गटाकडून अर्ज भरण्याची शक्यता

अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभांच्या जागांसाठी लोकसभा निवडणुकांसोबतच १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४६ जागांवर विजय मिळवत सत्ता खेचून आणली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पाच तर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने तीन जागांवर विजय मिळवला होता. निवडणुकीत काँग्रेसला १ तर तीन जागी अपक्ष निवडून आले होते.

Arunachal Pradesh New CM: अरुणाचल प्रदेशमध्ये पेमा खांडूंची हॅट्रिक! तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान
Maharashtra Politics 2024: महायुतीतून लढणार, 20 जागा मिळणार?; मनसे आदित्य ठाकरेंना वरळीत आव्हान देणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com