नीट परीक्षा वाद
Neet Result ControversySaam Tv

Neet Result Controversy: ब्रेकिंग! नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court Directs Neet Re-examination: नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करणे योग्य नाही, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.
Published on

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

सुप्रीम कोर्टात आज NEET-UG 2024 च्या निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी झाली आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती. यासोबतच ४ जूनच्या निकालाच्या आधारे केले जाणारे कॉउंसलिंग बंद करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती.

कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार (Neet Exam) दिला आहे. १५६३ विद्यार्थ्यांसाठी २३ जून रोजी पुनर्परीक्षा होणार असल्याची माहिती एनटीएने न्यायालयात दिली आहे. पूर्णपणे परीक्षा रद्द करणे योग्य नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. एनटीएला दोन आठवड्यांत याचिकांवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने आजच्या सुनावणीमध्ये दिलेले आहेत.

५ मे रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा (Neet Re-examination) घेण्यात यावी, असाही उल्लेख याचिकेत करण्यात आला होता. यापूर्वी ११ जून रोजी सुप्रीम कोर्टात विद्यार्थिनी शिवांगी मिश्रा आणि इतर ९ विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी (Supreme Court) झाली होती. ती याचिका निकाल जाहीर होण्यापूर्वी म्हणजे १ जून रोजी कोर्टात दाखल करण्यात आली होती.

नीट परीक्षा वाद
Neet Result Controversy: नीट परीक्षार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे आदेश

यावेळी फेरपरीक्षेची तारीख आजच ठरवली जाईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तर कोर्टाच्या निर्देशानुसार २३ जून रोजी १५६३ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार आहे. या परिक्षेचा निकाल ३० जूनपूर्वी निकाल लावला (Neet Result Controversy) जावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. १५६३ विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क हे ग्रेस मार्कांशिवाय दिले जाणार आहेत. एनटीएने दिलेली माहिती कोर्टाने नाकारली आहे. बाकी २ याचिकांवर न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

नीट परीक्षा वाद
NEET Result : नीट परीक्षेच्या निकालाविरोधात संभाजीनगरात याचिका दाखल; १८ जूनला होणार खंडपीठात सुनावणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com