Girl Death Saam Tv
देश विदेश

Shocking: फुगा फुगवताना फुटला, श्वसननलिकेत तुकडा अडकला; १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये फुगा फुगवताना एका मुलीचा मृत्यू झाला. फुगा फुटून त्याचे तुकडे श्वसननलिकेत अडकले. त्यामुळे तडफडून मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

Summary -

  • बुलंदशहरमध्ये १३ वर्षांच्या मुलीचा फुगा फुगवताना मृत्यू

  • फुग्याचे तुकडे श्वसननलिकेत अडकल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला

  • भावाचा वाढदिवस असल्याने ती त्याला फुगा फुगवून देत होती

  • या घनटेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला

फुगा फुगवताना फुटला आणि त्याचे तुकडे श्वसननलिकेत अडकून एका १३ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेच्या बुलंदशहराच्या पहासू भागातील दीघी गावामध्ये घडली. ३ वर्षांच्या भावाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करत असताना ही घटना घडली. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिघी गावामध्ये राहणारे अशोक कुमार यांच्या ३ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यांची १३ वर्षांची मुलगी कुमकुमने भावाचा वाढदिवस असल्याने त्याच्यासाठी फुगा घेऊन आली होती. कुमकुम फुगा फुगवत होती. तेवढ्यात फुगा फुटला आणि या फुग्याचे तुकडे कुमकुमच्या घश्यात गेले. काही तुकडे कुमकुमच्या श्वननलिकेत अडकले.

फुग्याचे तुकडे श्वसननलिकेत अडकल्यामुळे कुमकुमचा श्वास गुदमरला. ती तडफडू लागली. कुटंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. श्वसननलिकेत अडकलेले फुग्याचे तुकडे काढण्यापूर्वीच तिने प्राण सोडले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशोक यांची मुलगी कुमकुम ही चार भावंडांमध्ये सर्वात मोठी होती. ती सर्व मुलांची काळजी घ्यायची आणि सर्वांवर प्रेम करायची. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला.

कुमकुमच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या ३ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. कुमकुमने त्याच्यासाठी दुकानातून फुगा विकत आणला. आपल्या भावाला खूश करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. घरी आल्यानंतर ती फुगा फुगवताना ही घटना घडली. याप्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार करण्यात आली नाही. पण या घटनेनंतर पालिकांनी लहान मुलांना फुगे फुगवायला देताना काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत हायकोर्टानं दिला महत्वाचा आदेश, केंद्र सरकारलाही धाडली नोटीस

रायगडच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी, जिल्हा परिषद वादावर कसा पडला पडदा?

Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

Masala Kairi Recipe: जिभेचे चोचले पुरवणारी चटपटीत मसाला कैरी घरी कशी बनवायची?

LPG Cylinder VS Induction: LPG की इंडक्शन? कशावर जेवण बनवणे जास्त स्वस्त

SCROLL FOR NEXT