Trump Tariffs vs India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा फुगा फुटणार; पीएम मोदींनी आखला नवा प्लॅन

GST Reform to Boost Domestic Economy: भारत आपल्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कर सुधारणा करत आहे. ट्रम्प टॅरिफचा निर्यातीवर होणारा नकारात्मक परिणाम रोखण्यासाठी GST 2.0 फायदेशीर ठरणार आहे.
GST Reform to Boost Domestic Economy
GST 2.0: India’s big economic move to counter Trump tariffs and boost growth.saamtv
Published On
Summary
  • ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतीय निर्यातीवर मोठा परिणाम.

  • भारत सरकार GST 2.0 च्या माध्यमातून नवी आर्थिक योजना आखत आहे.

  • GST 2.0 फक्त कर सुधारणा नसून अमेरिकन टॅरिफला उत्तर आहे.

  • देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी GST 2.0 महत्त्वाची भूमिका बजावणार.

जगभरात डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफची चर्चा सुरूय. अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर मोठा टॅरिफ लावलाय, यामुळे भारताच्या निर्यातीला फटका बसणार आहे. परंतु भारत सरकारनेही ट्रम्प यांना धडा शिकवण्याचा प्लॅन बनवलाय. भारतातील सामान्य जनेतला दिलासा देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार जीएसटी २.० च्या अंतर्गत मोठे बदल करणार अशून यामुळे ट्रम्प यांच्या टॅरिफचा फुगा फुटणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर जीएसटीमध्ये बदल करण्याची तयारी सुरू केलीय. याला जीएसटी २.० म्हटलं जात आहे. सरकार जीएसटीमधील दोन स्लॅब रद्द करणार आहे. सरकार जीएसटीमधील १२ आणि २८ टक्के स्लॅब रद्द करणार आहे. यामुळे अन्नपदार्थ, कपडे, घरगुती वस्तू स्वस्त होणार आहेत. हे वस्तू स्वस्त झाल्याने सामन्य जनेतला दिलासा मिळणार आहे. दरम्यान सरकारने २ आणि ३ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेची बैठक बोलवलीय. यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

GST Reform to Boost Domestic Economy
थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

जीएसटीमधील बदलामुळे टॅरिफचा प्रभाव कमी होईल?

मनीकंट्रोलच्या एका संशोधन अहवालानुसार, काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा वस्तू स्वस्त होतील तेव्हा लोक अधिक खरेदी करतील. यामुळे बाजारात मागणी वाढेल आणि व्यापाऱ्यांची विक्री वाढेल. हे एखाद्या साखळी पद्धतीने काम करेल.

जेव्हा वस्तू अधिक विकल्या जातील तेव्हा त्या वस्तूंचे कारखाने अधिक वाढतील. त्यामुळे नोकऱ्यांचे प्रमाण वाढतील. अर्थव्यवस्थेला गती येईल. त्यामुळे अर्थतज्ज्ञ म्हणतात की, जीएसटीमधील बदल करणं टॅरिफचा प्रभाव कमी करण्यास फायदेशीर ठरेल. जे नुकसान निर्यात बंद झाल्यामुळे होणार आहे ते देशातील व्यापाराने भरून काढले जाईल.

GST Reform to Boost Domestic Economy
Central Government: ऐन सणाच्यावेळी केंद्र सरकारनं दिली 'गुड न्यूज', पगार अन् पेन्शनबाबत घेतला मोठा निर्णय

अहवालात असेही म्हटलं की, जीएसटीमध्ये कपात केल्याने उपभोग्य वस्तूंच्या सुमारे १०% महागाई थेट कमी होऊ शकते. यामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळणार आहे. अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे एका वर्षात महागाई दरात ५०-६० बेसिस पॉइंट्सची घट होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com